नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) निषेधाचा फलक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर फडकविणाऱ्या व घोषणा देणा-या दिल्लीतील दोन महिलांच्या घरावर संतप्त लोक चालून गेले. त्यामुळे सहा तास घरात कोंडून राहिलेल्या या महिलांची पोलीस आल्यानंतरच जमावाच्या तावडीतून सुटका झाली. हा प्रकार रविवारी लजपत नगर येथे घडला.या दोन महिलांपैकी सूर्या राजप्पन (२७ वर्षे) या दिल्ली उच्च न्यायालयात वकिली करतात. राजप्पन व त्यांची मैत्रिण एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहातात. राजप्पन यांनी सांगितले की, आमचे घर असलेल्या रस्त्यावरून अमित शहा यांची संध्याकाळी पावणेपाच वाजता मिरवणूक जात असताना त्यांच्यासमोर आम्ही दोघींनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. अमित शहा यांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही, मात्र घरमालक मात्र या घोषणांनी संतप्त झाले. त्यानंतर पाचच मिनिटांतच घरमालक व काही जण आमच्या घराबाहेर जमा झाले. दरवाजा ठोठावू लागले. या प्रकाराने आम्ही घाबरलो. ते लोक आम्हाला घराबाहेर यायला सांगत होते. त्याला आम्ही स्पष्टपणे नकार दिला. सरतेशेवटी रात्री अकरा वाजता पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून आमची सुटका केली.सूर्या राजप्पन यांनी सांगितले की, अमित शहा यांच्यासमोरच रविवारी निदर्शने करण्याची संधी आम्हाला मिळणार होती. त्यासाठी आम्ही एका पांढºया चादरीवर गुलाबी व जांभळ््या रंगाच्या स्प्रेने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध करणाºया घोषणा लिहिल्या व तो फलक घराच्या गॅलरीत फडकाविला.संध्याकाळी अमित शहा यांची मिरवणूक घरावरून जात असताना आम्ही गॅलरीत लावलेला फलक तिथे दोन मिनिटेही टिकला नाही. कारण मिरवणुकीतील लोकांनी तो काढून टाकला. त्यानंतर काही जण आमच्या घरावर चालून आले. त्यामुळे मी त्वरित माझे वडील, वकील मित्र, पोलिसांना बोलावून घेतले.>तुुम्ही मुलीला काबूत ठेवले नाहीतुम्ही मुलीला काबूत ठेवले नाहीत असे या दोन महिलांच्या घराबाहेर जमलेल्या लोकांनी सूर्या राजप्पन यांच्या वडिलांना ऐकविले. राजप्पन यांनी या सर्व घटनेची दिल्ली पोलिसांत तक्रार केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच सूर्या राजप्पन व त्यांची मैत्रीण या भाड्याच्या घरात राहायला आले होते. रविवारच्या प्रकारानंतर या दोघी दुसºया घरात राहायला गेल्या आहेत.
सीएएविरोधात फलक; महिलांच्या घरावर जमाव गेला चालून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 4:55 AM