नवी दिल्ली: एका प्रवाशानं विमानात दहशतवादी असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी एअर इंडियाच्या विमानात हा प्रकार घडला. मानसिक आजाराची पार्श्वभूमी असलेला एक प्रवासी दिल्लीहून गोव्याला निघाला होता. विमान हवेत असताना त्यानं दहशतवादी लपून बसल्याचा दावा केला. त्यामुळे सगळेच प्रवासी घाबरले. विमानात दहशतवादी असल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाचं नाव झिया उल हक असं आहे. तो दिल्लीचा रहिवासी आहे. आपण दिल्ली पोलीस दलाच्या स्पेशल सेलमध्ये काम करत असल्याचा दावा त्यानं केला. एअर इंडियाचं विमान गोव्यातल्या विमानतळावर उतरताच त्याला गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
विमान हवेत असताना 'तो' अचानक उठला, विमानात दहशतवादी असल्याचं म्हणत ओरडू लागला अन्...
By कुणाल गवाणकर | Published: October 23, 2020 11:41 AM