ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि.20 - दहशतवादाच्या मुद्यावरून भारताने सिंधू करार तोडण्याचा इशारा दिल्याचा पाकिस्तानने धसका घेतला आहे. भारताने सिंधू पाणी कराराचे उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करू, असा इशारा पाकिस्तानने उसने अवसान आणत दिला आहे.
साप्ताहिक संबोधनामध्ये सिंधू कराराबाबत बोलताना पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीस झकारिया म्हणाले, "सिंधू पाणी कराराबाबत भारताकडून कोणतीही कृती झाल्यास पाकिस्तान त्याला प्रत्युत्तर देईल." दरम्यान, भारताकडून सार्कच्या मंचाचा वापर राजकीय महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यासाठी होत असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाही, असे सांगत सिंधू कराराची समीक्षा करण्याचे संकेत दिले होते.