नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदी कायम ठेवताना त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवावी लागेल, असे स्पष्ट संकेत दिल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात डावलले जात असल्याच्या भावनेमुळे पक्षावर अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने नाराजी व्यक्त करूनही भाजपश्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढून राष्ट्रीय राजकारणात आणण्याचा उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागेल, असे संकेत त्यांना देण्यात आले आहेत. बीडमधून लोकसभेवर निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांना राज्याच्या राजकारणात सामावून घेतले जाईल आणि परळी विधानसभा मतदारसंघातून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मार्ग प्रशस्त केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 10:48 AM