नवी दिल्ली : येथील एनजीओ 'मिरची झोंक'ने महिलांच्या स्वसंरक्षणासाठी एक स्प्रे तयार केला आहे. विशेषत: लैंगिक गुन्ह्यांमध्ये हा स्प्रे महिलांचे संरक्षण करील, असा दावा या एनजीओने केला आहे. डू इट युअरसेल्फ अर्थात, तुम्ही स्वत: हा स्पे्र घरी बनवू शकता. ‘मिरची झोंक’ या एनजीओने हा स्प्रे तयार केला आहे. या संघटनेच्या संस्थापक सीमा मलिक यांनी सांगितले की, ‘महिलांना अडचणीच्या काळात आपली सुरक्षा करण्यासाठी हा स्प्रे उपयोगी पडेल. याचा खर्च फक्त २५ रुपये आहे. बाजारात असे स्प्रे १७० ते ४०० रुपयांना मिळतात. महिलांना या स्पे्रची माहिती व्हावी, म्हणून याचे नमुने मोफत देण्यात येत आहेत, तर स्प्रे बनविण्याची प्रक्रिया बाटलीवर देण्यात आली आहे.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)>असा बनवा स्पे्र या एनजीओने दिलेल्या माहितीनुसार, स्प्रे तयार करण्यासाठी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्या. एक कप पाण्यात ती मिसळून टाका. पातळ कपड्याने ते गाळून घ्या, कारण अतिरिक्त पावडर त्यातून वेगळी होऊ शकेल. त्यानंतर, हे मिरचीचे पाणी एका बाटलीत टाका आणि त्याला स्पे्रचे झाकण लावा. महिलांच्या स्वसंरक्षणासाठी आम्ही टाकलेले हे एक पाऊल आहे, असे या एनजीओने सांगितले.
स्वरक्षणासाठी पेपर स्प्रे
By admin | Published: June 28, 2016 6:04 AM