१७ परीक्षार्थी रडारवर पेपरफुटी प्रकरण : परिचर भरती परीक्षेची तारीख अनिश्चित
By admin | Published: January 02, 2016 8:33 AM
जळगाव- जिल्हा परिषदेच्या परिचर भरतीच्या कॉपी प्रकरणात पोलिसांनी जि.प.कडून १७ परीक्षाथींची माहिती मागविली आहे. चौकशी दरम्यान संशयास्पद माहिती मिळाल्याने या १७ परीक्षार्थींनाही चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे.
जळगाव- जिल्हा परिषदेच्या परिचर भरतीच्या कॉपी प्रकरणात पोलिसांनी जि.प.कडून १७ परीक्षाथींची माहिती मागविली आहे. चौकशी दरम्यान संशयास्पद माहिती मिळाल्याने या १७ परीक्षार्थींनाही चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे. यासंदर्भात तपासाधिकार्यांनी जि.प.ला पत्र दिले आहे. संबंधित परीक्षार्थींची माहिती प्रशासन गोळा करीत आहे. ती लवकरच तपासाधिकार्यांना दिली जाईल, अशी माहिती अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांनी दिली. तारीख अनिश्चितपरिचर भरतीसंबंधी नव्याने परीक्षा घेण्यास विभागीय आयुक्त यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार १० जानेवारी परीक्षा घेण्याचे जि.प.चे नियोजन आहे. परंतु याच तारखेला स्टाफ सिलेक्शन कमिशनचीदेखील परीक्षा आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेला बसलेले अनेक विद्यार्थी परिचर भरतीची परीक्षा देणार आहेत. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्या तर परीक्षा केंद्र निश्चित करणे व इतर प्रक्रियेसंबंधी गोंधळ होईल. यामुळे परिचर भरतीसाठी १० जानेवारी ऐवजी दुसरी तारीख निश्चित करण्याचा विचार जि.प.प्रशासन करीत आहे.