पप्पू...! राहुल गांधींविरोधात आता ललित मोदीची एन्ट्री; ब्रिटनमध्ये केस ठोकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:49 AM2023-03-30T11:49:18+5:302023-03-30T11:59:34+5:30
ललित मोदी याने राहुल गांधी यांना उघडपणे पप्पू म्हणत राहुल गांधी आता सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे.
आधीच मोदी वक्तव्यावरून राहुल गांधींची खासदारकी, पंतप्रधान पदाची उमेदवारी आदी सारे राजकीय करिअरच संकटात आलेले असताना आता ललित मोदीने दंड थोपटले आहेत. ललित मोदीने ट्विट करून राहुल गांधींविरोधात ब्रिटनच्या न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
ललित मोदी याने राहुल गांधी यांना उघडपणे पप्पू म्हणत राहुल गांधी आता सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे. मोदी याने भले मोठे ट्विट केले आहे. ''राहुल गांधी मला फरार म्हणत आहेत, परंतू त्यांच्याकडे याचे काय पुरावे आहेत. कोणत्या आधारे मला फरार म्हणत आहेत. मला कुठे दोषी ठरविले गेले आहे का? त्यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते माहिती न ठेवता बदल्याचे राजकारण करत आहेत.'', असे ललित मोदीने म्हटले आहे.
तसेच मी या विरोधात राहुल गांधींवर युकेच्या कोर्टात खटला दाखल करणार आहे. मला खात्री आहे की ते माझ्याविरोधात सर्व ठोस पुरावे घेऊन येतील. राहुल गांधी स्वत:ला कसे मुर्ख बनवून घेतात हे मला पहायचे आहे. आर के धवन, सीताराम केसरी, मोतीलाल व्होरा, सतीश शर्मा, एनडी तिवारी रहे सर्व गांधी कुटुंबाशी संबंधीत आहेत. यांच्या परदेशात मालमत्या कशा आहेत? हे कमलनाथना विचारा, असा आरोपही ललित मोदीने केला आहे.
ललित मोदीचे ट्विट इथे वाचा...