नवी दिल्ली : देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 32 लाखांच्या पुढे गेली आहे. एकीकडे केंद्र सरकार लोकांना घरी राहण्याचा सल्ला देत आहे, तर दुसरीकडे NEET आणि JEE परीक्षा देखील घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा घेण्याच्या निर्णयावरुन सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. तसेच, यासाठी विद्यार्थी सतत विरोध करीत आहेत. अनेक राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान, यावरून जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार पप्पू यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
पप्पू यादव यांनी NEET आणि JEE परीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरून ट्विटद्वारे मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. "नरेंद्र मोदीजी, विद्यार्थी तुमच्याप्रमाणे आठ हजार कोटींच्या चार्टर्ड प्लेनमधून IIT आणि NEET ची परीक्षा द्यायला जात नाही. ते ट्रेन आणि बसच्या गर्दीतून प्रवास करतात, ज्या अद्याप सुरु झालेल्या नाहीत. तर आपल्याला एवढीशी गोष्ट समजत नाही का, हे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी केंद्रावर कसे जाणार. माल (पैसा) घेऊन त्यांच्या (विद्यार्थ्यांच्या) जीवाचा शत्रू का होत आहात?", असे ट्विट पप्पू यादव यांनी केले आहे.
दरम्यान, पप्पू यादव यांनी या ट्विटमध्ये जो संदर्भ दिला आहे तो 'एअर इंडिया वन' या विमानांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या विदेश प्रवासासाठी एक अत्याधुनिक विमान तयार झाले आहे. 'एअर इंडिया वन' असे या विमानाचे नाव असल्याची माहिती सांगितली जात आहे. अमेरिकेत हे विमान तयार झाले असून लवकरच ते भारतात येणार आहे. हे विमान आणण्यासाठी Air India, Indian Air Force आणि सुरक्षा संस्थांचे अधिकारी अमेरिकेला गेले आहेत.
आणखी बातम्या...
'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट
'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
धक्कादायक! Rail Yatri वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक, डेबिट कार्ड-UPI चे होते डिटेल्स
आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार
CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...