शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

प. बंगालमधील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट

By admin | Published: April 22, 2016 3:11 AM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या ६२ जागांसाठीच्या गुरुवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मार्क्सवादी पक्षाचा पाठीराखा ठार झाल्यामुळे गालबोट लागले

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या ६२ जागांसाठीच्या गुरुवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मार्क्सवादी पक्षाचा पाठीराखा ठार झाल्यामुळे गालबोट लागले. याच पक्षाचे चार कार्यकर्ते जखमीही झाले. या टप्प्यातील मतदान मोठ्या उत्साहात झाले. दरम्यान राज्यात ७९.२२ टक्के मतदानाची नोंद झाली.बर्दवानमधील १६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक तर कोलकात्यात सर्वांत कमी मतदान नोंदले गेले. नाडिया आणि मुर्शिदाबादमध्येही बऱ्यापैकी मतदान झाले.बर्दवानमध्ये केंद्रप्रमुख मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार पोलिंग एजंटस्ने केल्यानंतर त्याला तेथून हटविण्यात आले. केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना कोलकात्यातील जोरासँको मतदारसंघात मतदान केंद्रावर ते आईसह मतदानासाठी गेले असताना त्यांना अनेक प्रश्न विचारून त्रासून सोडण्यात आले, असा आरोप होता. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी तेथे सुरक्षा दले पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली, असे सांगितले.माकपचा (एम) पाठीराखा तहिदूर इस्लाम (३५) याचा मृतदेह दोमकल विधानसभा (जि. मुर्शिदाबाद) मतदारसंघाच्या शिबापाडा मतदान केंद्रापासून ५०० मीटरवर आढळला. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसचे नेते अन्वर खान यांना मुख्य निवडणूक अधिकारी सुनील गुप्ता यांच्या सूचनेवरून अटक करण्यात आली. दूरचित्रवाणी वाहिनीवर खान पक्ष कार्यकर्त्यांशी फोनवर बोलत असताना निवडणूक आयोगाबद्दल अपशब्द वापरताना आढळले होते. केतुग्राम मतदारसंघात स्वतंत्र घटनेत चार कायकर्ते जखमी झाले. मतदान क्रमांक ७८ वर झालेल्या झटापटीत माकपच्या (एम) कार्यकर्त्याचा कान कापला गेला, तर दुसऱ्याचा पाय मोडला. मतदान केंद्र क्रमांक ४८ वर माकपचे दोन कार्यकर्ते त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आल्यानंतर जखमी झाले. माकपचे (एम) उमेदवार व माजी मंत्री अनिसूर रहमान यांनी दावा केला की, आमचा कार्यकर्ता तहिदूर इस्लाम हा मतदान केंद्राबाहेर फेकल्या गेलेल्या बॉम्बमध्ये ठार झाला. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सी. सुधाकर यांनी हा खून निवडणुकीशी संबंधित नसल्याचे सांगितले. डाव्या पक्षांनी तहिदूर इस्लामच्या हत्येबद्दल तृणमूल काँग्रेसवर ठपका ठेवला असून, तो पक्ष मतदारांना भीती घालण्यासाठी दहशत निर्माण करीत असल्याचे म्हटले. (वृत्तसंस्था)