कोलकाता: पश्चिम बंगालच्या कालिम्पोंग पॅराग्लायडिंग करताना भीषण अपघात झाला आहे. यामध्ये नेपाळच्या एका पॅराग्लायडिंग पायलटचा मृत्यू झाला आहे. ग्लायडर विमानात बिघाड झाल्यानं ही दुर्घटना घडली. ग्लायडर विमान आणि पॅराग्लायडर्सला जोडणारा दोर तुटल्यानं पॅराग्लायडिंग करणारे दोनजण खाली कोसळले. यात पॅराग्लायडिंग पायलटचा मृत्यू झाला, तर पॅराग्लायडिंगचा आनंद घेत असलेला पर्यटक गंभीर जखमी झाला.रविवारी पश्चिम बंगालच्या कालिम्पोंगमध्ये पॅराग्लायडिंग करताना अपघात झाला. ग्लायडर विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं तार तुटली आणि पॅराग्लायडिंग करणारे दोनजण थेट खाली कोसळले. यामध्ये पॅराग्लायडिंग पायलट आणि पर्यटकाचा समावेश आहे. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी पॅराग्लायडिंग पायलट पुरुषोत्तम यांना मृत घोषित केलं. पुरुषोत्तम हे मूळचे नेपाळचे आहेत.
Video: पॅराग्लायडिंग करताना भीषण अपघात; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 4:59 PM