महाशिवरात्रीनिमित्त नशिराबादला पारायण
By admin | Published: February 29, 2016 10:01 PM
नशिराबाद : वार्ताहर
नशिराबाद : वार्ताहरमहाशिवरात्रीनिमित्त येथील मुक्तेश्वर महादेव मंदिरात आज १ मार्चपासून ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी पारायण महोत्सव व हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ मार्चला महोत्सवाची सांगता होईल.सप्ताह महोत्सवात रोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. पहाटे काकड आरती, विष्णूसहस्त्रनाम ७ वाजता, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ वाजता श्री शिवलिलामृत ग्रंथ पारायण, सायंकाळी हरिपाठ, रात्री ८ वाजता कीर्तने होतील. दि.१ रोजी देवीदास महाराज (भादली), २ रोजी ताराचंद महाराज (साकरी), ३ रोजी मोहनदास महाराज (धरणगाव पिंप्री), ४ रोजी अर्जुन महाराज (आळंदी), ५ रोजी शिवाजी महाराज पोळ (आळंदी), ६ रोजी श्रीकृष्ण जावळे महाराज (गोजरे), ७ रोजी बरडे, शास्त्री महाराज (नाशिक) यांचे कीर्तने होणार आहे. महाशिवरात्रीला रात्री दहा वाजता महाअभिषेक पूजन आरती होईल. दि.८ रोजी सकाळी ९ वाजता डॉ.विष्णू महाराज (जळगाव) काल्याचे कीर्तन करतील. त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.