शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

पहिल्यांदाच ड्रोनद्वारे पोहोचविले पार्सल; भारतीय टपाल खात्याचा अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 6:57 AM

भूज तालुक्यातील हाबय गावातून औषधांचे पार्सल घेऊन ड्रोनने भचाऊ तालुक्यातील नेर गावाच्या दिशेने उड्डाण केले.

अहमदाबाद : ‘कबुतर जा जा’ असे म्हणत त्याच्याकरवी आपल्या जवळच्या व्यक्तींनी पत्र, संदेश पोहोचविण्याची प्रथा फार जुनी आहे. सध्या ई-मेलच्या जमान्यातही विमानाने टपाल, पार्सलची ने-आण होते, पण देशातील टपाल खात्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ड्रोनद्वारे पार्सल पोहोचविण्याचा प्रयोग झाला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात ड्रोनने ४५ कि.मी.चे अंतर अवघ्या २५ मिनिटांत पार करून पार्सल योग्य ठिकाणी नेऊन दिले.

भूज तालुक्यातील हाबय गावातून औषधांचे पार्सल घेऊन ड्रोनने भचाऊ तालुक्यातील नेर गावाच्या दिशेने उड्डाण केले. त्या गावात ठरलेल्या ठिकाणी ड्रोनने उतरून पार्सल संबंधितांपर्यंत पोहोचविले. टपाल खात्याने म्हटले आहे की, देशामध्ये भविष्यात ड्रोनच्या साहाय्याने टपालाची ने-आण करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून गुजरातमध्ये  केलेला प्रयोग यशस्वी ठरला. पार्सल ड्रोनद्वारे पोहोचविण्याचा प्रयोग पार पडला. शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर वाढला पाहिजे, असे या महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. या महोत्सवात विविध प्रकारची ड्रोन लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. (वृत्तसंस्था)

ड्रोनमुळे टपाल सेवेत होतील मोठे बदलड्रोनद्वारे पार्सल, पत्रे पोहोचविण्यासाठी विशिष्ट अंतराकरिता किती खर्च येतो याचा अभ्यास गुजरातमध्ये यासंदर्भात झालेल्या प्रयोगात करण्यात आला. ड्रोनद्वारे येणारे पार्सल ताब्यात घेण्यासाठी टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने परस्परांशी संपर्क राखावा व इतर समस्यांवर देखील यावेळी सखोल विचार करण्यात आला. ड्रोनने पत्र, पार्सल पोहोचविण्याचा प्रयोग व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला तर आगामी काळात टपाल सेवेत खूप मोठे बदल होणार आहेत.