शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जुळ्या मुलांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू; जिल्हा प्रशासनाकडून मुलांच्या नावे प्रत्येकी 10 लाखांची एफडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 2:52 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,124 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,507 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसती-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे.  पंजाबच्या कपूरथलामध्ये कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीत 583 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये जुळ्या मुलांचा देखील समावेश आहे. त्यांच्या डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्र हरवलं आहे. त्यांची काळजी घेणारं कोणी नाही. यानंतर आता या मुलांना मदत करण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. दोन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी 10 लाख रुपयांची एफडी करण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही मुलांना सरकारी संस्थांकडून मोफत शिक्षण आणि मोफत उपचारही दिले जाणार आहेत. 

कोरोनामुळे पालक गमावलेल्या दोन मुलांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची एफडी करण्यात आली आहे. जिल्हा बालकल्याण समितीच्या बैठकीला संबोधित करताना, एडीसी अनुपम क्लेर म्हणाले की, कोरोनामुळे कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाल्यामुळे 8 कुटुंबांना प्रति कुटुंब 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्य़ात कोविडमुळे ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत त्यांचा डेटा स्वराज पोर्टलवर अपलोड करण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. अशा मुलांना कायदेशीर मदतही देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या