शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

बेटी धनाची पेटी! मुलगी जन्माला येताच मिळणार 11000 रुपये; करावे लागणार छोटेसे काम

By हेमंत बावकर | Published: October 18, 2020 3:11 PM

Save Girl Child: देशामध्ये लैंगिक असमतोल वाढू लागला आहे. दर हजार पुरुषांमागे स्रियांची संख्या घटत आहे. या लैंगिक असमानतेवर काम करणारी संघटना जेनेक्सने ही घोषणा केली आहे.

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार बरेच प्रयत्न करत आहे. आता लोकांची मानसिकताही बदलत चालली आहे. बऱ्याच खासगी हॉस्पिटलमध्ये तर प्रसुतीचा खर्चही घेतला जात नाही. बँका, पोस्टाच्याही विविध योजना मुलींसाठी आहेत. आता त्यात आणखी एका योजनेची भर पडली आहे.  मुलगी जन्माला येताच 11000 हजार रुपये दिले जाणार आहेत. 

देशामध्ये लैंगिक असमतोल वाढू लागला आहे. दर हजार पुरुषांमागे स्रियांची संख्या घटत आहे. या लैंगिक असमानतेवर काम करणारी संघटना जेनेक्सने ही घोषणा केली आहे. जेनेक्सने शनिवारी सांगितले की, या योजनेचा लाभ सर्वांना मिळणार आहे, मात्र त्यासाठी प्रसुतीच्या आधी पालकांनी त्यांचे नाव जेनेक्सच्या वेबसाईटवर नोंदवावे लागणार आहे. 

जेनेक्सने सांगितले की, या योजनेचा लाभ देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील लोकांना मोफत घेता येणार आहे. म्हणजेच यासाठी कोणतेही शुल्क किंवा अन्य स्वरुपात पैसे स्वीकारले जाणार नाहीत. यासाठी पालकांना www.genexchild.com या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. प्रसुतीनंतर मुलगी झाल्यास त्या पालकांना 11000 रुपये दिले जाणार आहेत. 

या योजनेचे महत्वाचे उद्दीष्ट जन्माला येणारी मुलगी 18 वर्षांची झाल्यावर स्वत:च्या पैशांनी सशक्त, पायावर उभी राहू शकेल हे आहे. तसेच अल्पवयीन असताना तिला मिळणारे हे पैसे शिक्षण, व्यवसाय किंवा लग्नाचे वय झाल्यानंतर तिच्या लग्नासाठीदेखील वापरण्यास स्वतंत्र असणार आहे. याचाच अर्थ तिच्यावर हे पैसे कधी वापरावेत याचे बंधन असणार नाही. 

परदेशातून मदत घेतलेली नाहीजेनेक्सचे संस्थापक पंकज गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही 1.5 लाख नेटवर्क पार्टनरांसोबत मिळून या योजना तयार केली आहे. आम्हाला याचा अभिमान वाटत आहे. पुढील पिढी स्वावलंबी आणि स्वतंत्र बनविण्याच्या दिशेने हे एक छोटेसे पाऊल आहे. कंपनीने यासाठी कोणतीही परकीय किंवा परदेशातून मदत घेतलेली नाही, तसेच आम्ही विविध योजनांतील सदस्यांकडूनही पैसे घेतलेले नाहीत. 

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासhospitalहॉस्पिटलpregnant womanगर्भवती महिलाPregnancyप्रेग्नंसी