"नातीने आजीचं नाक कापलं"; परेश रावल यांचा प्रियंका गांधींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 09:52 AM2020-07-03T09:52:53+5:302020-07-03T09:56:35+5:30
प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे. प्रियंका यांना 1 ऑगस्ट 2020 पर्यंत बंगला खाली करण्यासंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे.
नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे. प्रियंका यांना 1 ऑगस्ट 2020 पर्यंत बंगला खाली करण्यासंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रियंका गांधी सरकारी बंगला सोडून खासगी निवासस्थानी जाणार आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने त्यांना सरकारी बंगला सोडण्यासंबंधी दिलेल्या नोटीसमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याच दरम्यान बंगल्यावरून बॉलिवूड अभिनेते आणि भाजपा नेते परेश रावल यांनी प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
नातीनं आजीचं नाक कापलं असं म्हणत त्यांनी प्रियंका गांधीवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी यासंबंधीत ट्विट केलं आहे. "मोफत मिळालेल्या बंगल्यात राहून नातीनं आजीचं नाक कापलं" असं म्हणत परेश रावल यांनी प्रियंका यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विशेष रक्षण गटाचे (एसपीजी) संरक्षण काढून घेण्यात आल्याच्या आधारे त्यांना सरकारी बंगला सोडण्यास सांगण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले आहे. 1 ऑगस्टपर्यंत सरकारी बंगला सोडावा, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
मुफ़्त के बंगले में रहेकर पोती ने दादी की नाक कटवा दी !
— Paresh Rawal (@SirPareshRawal) July 2, 2020
गृहमंत्रालयाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रियांका गांधी यांचे एसपीजी संरक्षण काढून घेतले होते. 1997 मध्ये एसजीपी संरक्षणामुळे त्यांना 35 लोधी एस्टेट स्थित सरकारी बंगला देण्यात आला होता. काँग्रेसने या नोटीसवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही; परंतु सूत्रांनुसार नोटीस मिळण्याच्या आधीपासून सरकारी बंगला सोडण्याचा त्या विचार करीत होत्या. त्या दिल्ली, गुरुग्राममध्ये खाजगी बंगल्यात राहतील किंवा मेहरोली येथील फार्म हाऊसमध्येही जाण्याची शक्यता आहे, असेही संकेत आहेत.
लखनौतच राहण्याचा त्यांचा इरादा असून, त्यांनी तेथे घरही घेतले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची एसपीजी कमांडोंची सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली. त्यानंतर त्यांना केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली झेड प्लस सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे.
CoronaVirus News : ...म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केले काही बदलhttps://t.co/t67aaPDjbM#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 3, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम
बारा रुपये दराने पेट्रोल खरेदी गेले अन् 12 वाजले; पाहा नेमके काय घडले
"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"
Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; म्यानमारमधील खाणीत भूस्खलन, 50 जणांचा मृत्यू
CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
Sushant Singh Rajput Suicide : आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर 'हे' केलं होतं सर्च