शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

संसद ठप्प; दुसरा दिवसही पाण्यात

By admin | Published: July 23, 2015 12:04 AM

ललित मोदीप्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्रीद्वय वसुंधरा राजे आणि शिवराजसिंग चौहान यांच्या

नवी दिल्ली: ललित मोदीप्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्रीद्वय वसुंधरा राजे आणि शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्यानी मागणी करणारी काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बुधवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही पाण्यात वाहून गेला.गदारोळात दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार ठप्प पडल्याने अखेर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. सत्ताधाऱ्यांची चर्चेची तयारी असताना विरोधक मात्र परराष्ट्र मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच चर्चा या मागणीवर ठाम होते.लोकसभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व सदस्य काळ्या पट्ट्या बांधून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपच्या सदस्यांनी आसनासमक्ष येऊन ‘नही चलेगी नही चलेगी भ्रष्ट सरकार नही चलेगी’,अशी नारेबाजी केली. डाव्या पक्षांचे सदस्यही त्यात सहभागी झाले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही गोंधळ सुरूच होता. तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या सदस्यांनीही स्वतंत्र उच्च न्यायालयाची मागणी उचलून धरली.लोकसभा अध्यक्षांची ताकीदसकाळी कामकाज सुरू होताच विरोधकांनी राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते. नंतर निघून गेले. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी विरोधी पक्ष सदस्यांना शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला. परंतु त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. दरम्यान सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनी व्यापमं हा राज्याचा विषय असल्याकडे लक्ष वेधून सभागृहात एखाद्या राज्याचा विषय उपस्थित करण्याची परवानगी दिल्यास आम्हीसुद्धा केरळ, हिमाचल प्रदेश, आसाम आणि गोव्यातील वादग्रस्त मुद्दे चर्चेसाठी उपस्थित करू असा इशारा दिला. स्थगन प्रस्ताव नोटीस फेटाळलीलोकसभा, राज्यसभेत अनेक विरोधी सदस्यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. परंतु ती फेटाळ्यात आली. (वृत्तसंस्था)