गळाभेट आणि गळ्यात पडण्यातला फरक कळला; मोदींचा राहुलना अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 05:37 PM2019-02-13T17:37:27+5:302019-02-13T17:42:35+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाला संबोधित करत आहेत. ते म्हणाले, 2014ला मी पहिल्यांदा खासदार झालो.

parliament live cag report on rafale narendra modi in lok sabha | गळाभेट आणि गळ्यात पडण्यातला फरक कळला; मोदींचा राहुलना अप्रत्यक्ष टोला

गळाभेट आणि गळ्यात पडण्यातला फरक कळला; मोदींचा राहुलना अप्रत्यक्ष टोला

Next

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाला संबोधित करत आहेत. ते म्हणाले, 2014ला मी पहिल्यांदा खासदार झालो. त्यामुळे मला लोकसभेतल्या गल्ल्या, दरवाजे आणि नियमांची माहिती नव्हती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. लोकसभेत पहिल्यांदाच आल्यानंतर गळाभेट आणि गळ्यात पडणं यात काय फरक असतो, ते मला समजलं. पहिल्यांदाच पाहिलं की, सभागृहात डोळे मारले जातात. मी ऐकलं होतं की भूकंप येतो. परंतु कोणताही भूकंप आलेला नाही. बऱ्याचदा विमानं उडवली गेली, परंतु लोकशाहीची मर्यादा आणि उंची एवढी मोठी आहे की, विमानंही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

या सभागृहानं 1400हून अधिक कायदे संपवले. कायद्यांचंही एक जंगल झालं होतं. ही तर सुरुवात आहे, अजून बरीच कामं करायची आहेत. त्यासाठी मुलायम सिंह यांनी मला आशीर्वाद दिले आहेत. यावेळी मोदींनी राफेल करारावरही भाष्य केलं. सध्याच्या एनडीए सरकारने केलेला राफेल विमानांचा करार हा आधीच्या यूपीए सरकारने केलेल्या करारापेक्षा 2.86 टक्क्यांनी स्वस्त असल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच मोदी सरकारने 126 विमानांच्या तुलनेत 36 विमानांसाठी करार करताना एकूण 17.08 टक्के पैसे वाचवले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.


फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल विमानांसाठी करार केला होता. त्याआधी यूपीए सरकारच्या काळात 126 विमानांसाठी करार झाला होता. मात्र त्यावेळी अनेक मुद्द्यांवर एकमत न झाल्याने हा करार बारगळला होता.
मात्र कॅगचा अहवाल सादर होण्यापूर्वीच काँग्रेसने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 141 पानांचा कॅगचा अहवाल राज्यसभेत सादर झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करावे लागले.  तर लोकसभेमध्ये टीडीपी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातल्याने कामकाज स्थगित करावे लागले.



 

Web Title: parliament live cag report on rafale narendra modi in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.