Parliament Mansoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. आज चर्चेच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मणिपूरचा उल्लेख करत ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी 100 वेळा पंतप्रधान व्हावं, आम्हाला काहीही देणं-घेणं नाही.
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना अधीर रंजन म्हणतात की, देशाचा प्रमुख असल्याने PM मोदींनी मणिपूरच्या जनतेबद्दल बोलायला हवं. ही मागणी चुकीची नाही, ही सर्वसामान्यांची मागणी आहे. नरेंद्र मोदींनी 100 वेळा देशाचा पंतप्रधान व्हावं, आम्हाला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. आम्हाला देशातील जनतेशी देणं घेणं आहे.
अविश्वास प्रस्तावाची ताकद बघा, आम्ही पंतप्रधान मोदींना खेचून सभागृहात आणलं. ही संसदीय परंपरेची ताकद आहे. मणिपूरवरील चर्चेत पंतप्रधान मोदींनी सहभागी व्हावं, अशी आमची इच्छा होती. पण त्यांनी सभागृहात न येण्याची जणू काय शपतच घेतली आहे. अविश्वास प्रस्ताव आणण्याचा आमचा विचार आधी नव्हता, पण हा आणावा लागला. कारण, जिथे राजा आंधळा आहे, तिथे द्रौपदीचे वस्त्रहरण होणारचं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.