शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
3
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
4
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
5
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
6
"जाता जाता महायुती सरकारकडून महाउधळपट्टी, सरकारी जाहिरातींसाठी टेंडर मागून टेंडर’’, काँग्रेसची टीका   
7
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
8
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
9
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
10
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
11
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
12
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
13
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
14
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
15
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
16
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
17
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
18
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
19
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
20
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

संसदेत मोदी सरकारच्या कोंडीचा ‘आलम’ कायम

By admin | Published: March 10, 2015 11:37 PM

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी दहशतवादी मसरत आलम याच्या सुटकेवरून विरोधकांनी मोदी

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी दहशतवादी मसरत आलम याच्या सुटकेवरून विरोधकांनी मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली. जम्मू-काश्मिरातील मुफ्ती मोहंमद सईद यांचे सरकार बडतर्फ करा, अशी मागणी विरोधकांनी लोकसभेत लावून धरली, तर जम्मू-काश्मीर सरकारने ८०० विघटनवाद्यांच्या सुटकेची योजना आखल्याची धक्कादायक माहिती देत राज्यसभेत हल्लाबोल केला.गेले दोन दिवस संसदेच्या कामकाजाचा खोळंबा करणारे ‘आलम’ नावाचे वादळ पुरते शमलेले नाही. लोकसभेत शून्य तासाला अण्णाद्रमुकचे पी. वेणुगोपाल यांनी आलम याच्या सुटकेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधान व्यक्त केले. आलम याची सुटका हे देशद्रोहाचे कृत्य असून सईद यांचे सरकार बडतर्फ करून पीडीपीवर बंदी आणली जावी. राज्य सरकारला केंद्राने कोणते स्पष्टीकरण मागितले आहे ते आम्हाला कळू द्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली. पॅरोल देण्यात केंद्राची भूमिका नाहीतुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कोणत्याही कैद्याला केवळ न्यायालय व संबंधित राज्याच्या मंजुरीनंतरच पॅरोलवर सोडले जाते, असे सांगून गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी अभिनेता संजय दत्त याला वारंवार पॅरोल मंजूर करण्यात केंद्र सरकारची भूमिका असल्याचा इन्कार केला. शिवसेनेचे सदस्य राहुल शेवाळे यांनी लोकसभेत या संदर्भात प्रश्न विचारला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)