शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित, अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याशी वाद भोवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 12:06 PM

Parliament Monsoon Session Derek O Brien suspended: राज्यसभेत आज अध्यक्ष जगदीप धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार ...

Parliament Monsoon Session Derek O Brien suspended: राज्यसभेत आज अध्यक्ष जगदीप धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार वादावादी झाली. विरोधी सदस्य मणिपूरवर चर्चेची मागणी करत होते. पियुष गोयल म्हणाले की, गृहमंत्री कुठे आहेत ते मी तपासतो. आम्ही 12 वाजता चर्चेसाठी तयार आहोत. विरोधी सदस्यांनी 267 अन्वये चर्चेच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. पण अध्यक्षांनी त्यावेळी चर्चेसाठी नकार दिला. त्यानंतर झालेल्या वादावादी मध्ये ओब्रायन यांच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनापुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली.

नक्की काय घडलं?

आज राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. डेरेक खुर्चीत बसून ओरडायला लागले. यानंतर अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले. वास्तविक, वादाची सुरुवात पॉइंट ऑफ ऑर्डरवरून झाली. डेरेकना धनखड यांनी विचारले की, तुमचा पॉइंट ऑफ ऑर्डर काय आहे? डेरेक यांचा आवाज भलताच मोठा झाला. ते म्हणाले की सर, आम्ही मणिपूरवर चर्चेसाठी तयार आहोत, पण त्यांना (सत्ताधारी पक्षातील लोकांना) हवे तसे नाही. यावर अध्यक्ष संतापले. ते म्हणाले की, मी सदस्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, त्यांना पॉइंट ऑफ ऑर्डर हवी असेल तर उभे राहून पॉइंट ऑफ ऑर्डर देऊ नका. त्यावर डेरेक भाषणे देऊ लागले. नुसतीच जागा हवी असेल तर ते चांगले नाही. धनखड यांनी पुढे विचारले की, 'मला सांगा कोणत्या नियमानुसार तुम्ही पॉइंट ऑफ ऑर्डर देत आहात.' यावर डेरेकने उत्तर दिले, "नियम पान ९२ वर आहेत... नियम 267 हा विरोधी पक्षाचा नेता सतत मणिपूरवर चर्चेसाठी विचारतो", आणि मग ते जोरजोरात ओरडू लागले. यानंतर त्यांना सभापतींनी निलंबित केले. त्यांना संपूर्ण पावसाळी सत्रासाठी निलंबित करण्यात आले.

तृणमूल काँग्रेसच्या खासदाराची ओरड ऐकून धनखड यांनीही आवाज उठवला. तुमच्या जागेवर बसा, अशी सूचना त्यांनी केली. तरी ते बोलत राहिले. त्यानंतर सभापती उठले आणि डेरेक ओब्रायन यांना मी सभागृह सोडण्याचे आदेश देत आहे. त्यांना उर्वरित हंगामासाठी निलंबित करण्यात आले आहे, असे धनखड म्हणाले. यानंतर पियुष गोयल यांनी प्रस्ताव मांडला. त्यांनी डेरेक ओ'ब्रायन यांना उर्वरित हंगामासाठी निलंबनाचा प्रस्ताव ठेवला. ते सतत सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणून अध्यक्षांचा अवमान करत आहेत असे त्यात म्हटले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

 

 

 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनsuspensionनिलंबन