नवी दिल्ली- सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, यात मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर गदारोळ सुरू आहे. विरोधकांकडून सातत्याने सुरू असलेल्या गदारोळामुळे भाजप नेत्याने त्यांच्यावर सडकून टीका केली. विरोधी पक्ष संसदेत मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यापासून पळ काढत आहेत. सरकारकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत, हे माहीत असल्याने विरोधी पक्षांना चर्चेत रस नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
मणिपूरमधील घटनेबाबत विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीतील नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर केले. मणिपूर प्रकरणावर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांनी पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा दौरा करावा, असेही म्हटले.
सरकार चर्चेसाठी तयार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, सरकार चर्चेसाठी तयार आहे. मणिपूरला जाऊन आलेले गृहमंत्री अमित शहा उत्तर देण्यास तयार आहेत. विरोधकांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, तेच मला समजत नाही.
अमित शहा उत्तर देण्यास तयार भाजप नेते सुशील मोदी यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधी पक्षाचे नेते मणिपूर जाऊ शकतात, राष्ट्रपतींना भेटू शकतात, परंतु या मुद्द्यावर संसदेत होणाऱ्या चर्चेत भाग घेऊ शकत नाहीत. त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारकडे आहेत, हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना माहीत आहे, यामुळेच ते संसदेतील चर्चेपासून दूर पळत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.