नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशन 10 ऑगस्टपर्यंत चालणार असून यामध्ये एकूण 18 बैठका होणार आहेत. सरकारसमोर महत्त्वपूर्ण विधेयकं पारित करण्याचं आव्हान आहे तर दुसरीकडे संसदेत सरकारला चहुबाजूंनी घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक घेऊन पावसाळी अधिवेशनात सहकार्य करण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांना विशेषत: विरोधी पक्षांना केले.
LIVE UPDATES :- केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल - जमावाकडून होणाऱ्या मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी.- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी.