शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

भारताच्या नव्या संसद भवनाच्या बांधकामात रशिया-युक्रेन युद्धामुळे अडथळा, इंटेरिअरचं काम रखडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 5:38 PM

केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही या वर्षी संसदेचं हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होण्याची शक्यता धुसर आहे. सलग २४ तास बांधकाम सुरू असतानाही संसदेच्या बांधकामाला विलंब होत आहे.

केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही या वर्षी संसदेचं हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होण्याची शक्यता धुसर आहे. सलग २४ तास बांधकाम सुरू असतानाही संसदेच्या बांधकामाला विलंब होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या नवीन इमारतीच्या वायरिंग आणि ऑडियो व्हिज्युअल कामात विलंब होत आहे. नवीन संसद भवनासाठी काही ऑडियो व्हिज्युअल उपकरणं युक्रेनमधून येणार आहेत, जी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे वेळेवर पोहोचलेली नाहीत.

संसद भवनाच्या नवीन इमारतीचे सिव्हिल वर्क आणि स्ट्रक्चरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे परंतु मजल्यावरील आणि आतील फिनिशिंगचे काम सुरू आहे. म्हणजेच नवीन इमारतीतील इंटेरिअरचं काम अद्याप अपूर्ण आहे. ज्या गतीनं बांधकाम सुरू आहे ते पाहता संसद भवनाचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे या प्रकल्पाशी संबंधित लोकांचं म्हणणं आहे. नवीन संसद भवनाचं इंटेरिअरचं काम वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. जे नंतर संसदेत आणून फीट केले जाईल. उदाहरणार्थ, फर्निचर, कार्पेट्स, वॉल वूड इत्यादी सर्व कामे स्वतंत्रपणे तयार करून संसद भवनात आणून बसवली जाणार आहेत. 

नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन संसद भवन सुरू होणार?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच संसदेच्या नव्या इमारतीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. संसदेचं कामकाज संपलं की, तेथील कर्मचाऱ्यांसोबत मॉक ड्रिल करावं लागते. या मॉक ड्रीलमध्ये संसदेतील सर्व कर्मचारी, अधिकारी, सुरक्षा यांना वेळ द्यावा लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत किमान २ ते ३ आठवडे द्यावे लागतील. बांधकाम प्रक्रियेशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार कोविडमधील न्यायालयीन प्रक्रिया आणि पर्यावरणीय मंजुरीमुळे बांधकामाच्या कामात थोडा विलंब झाला आहे.

नवीन इमारतीत घेऊ शकलं जाईल एकदिवसीय विशेष अधिवेशनसंसदीय प्रक्रियेशी संबंधित एका व्यक्तीच्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनाची तयारी संसदेच्या जुन्या इमारतीतूनच केली जात आहे. मात्र, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नवीन इमारतीतून एक दिवस संसदेचे कामकाज चालवलं जाण्याची शक्यता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

टॅग्स :delhiदिल्ली