संसदेत घुसखोरी प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरू आहे. या आरोपींच्या चौकशीत अनेक मोठे खुलासेही होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागरने चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे की, त्याने संसदेबाहेर आत्मदहन करण्याचे ठरवले होते. मात्र जेल क्रीम खरेदीसाठी ऑनलाइन पेमेंट करू न शकल्याने त्याने ही योजना रद्द केली.
लखनऊचा रहिवासी आरोपी सागर शर्मा यानेही चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, यापूर्वी त्याची योजना काही वेगळीच होती. या योजनेद्वारे सागर संसदेबाहेर स्वत:ला पेटवून घेणार होता, पण नंतर त्याने या प्लॅनमध्ये बदल केला.
"मोहल्ल्याचा ट्यूटर बॉय, 2 वर्षांपूर्वी अचानक झाला गायब"; ललितबद्दल वडील आणि शेजारी म्हणतात...
सागरने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला असेही सांगितले की, जेलसारखे उत्पादन ऑनलाइन खरेदी करण्याची योजना आखण्यात आली होती, जी आगीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शरीरावर लावली जाऊ शकते. पण ऑनलाइन पेमेंट न मिळाल्याने जेलची खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे संसदेबाहेर स्वत:ला पेटलून घेण्याचे रद्द केले.
यापूर्वी सागरच्या लखनऊ येथील घरातून एक डायरी सापडली होती. यामध्ये त्याने घर सोडण्याची वेळ जवळ आल्याचे लिहिले होते. सागरच्या कुटुंबीयांनी ही डायरी स्थानिक पोलिसांना दिली आहे. आता ही डायरी दिल्ली पोलिसांकडे पाठवण्यात आली असून ते संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ही डायरी २०१५ ते २०२१ दरम्यान लिहिली आहे. यामध्ये क्रांतिकारकांचे काही विचार आणि कविता लिहिले आहेत.
आपल्या डायरीत एका ठिकाणी सागरने लिहिले आहे की, ‘आता घर सोडण्याची वेळ जवळ आली आहे.’ त्याने पुढे लिहिले की, एकीकडे भीती आहे तर दुसरीकडे काहीही करण्याची आगही धगधगत आहे. 'जगातील सामर्थ्यवान लोक ते नसतात ज्यांना हिसकावून घ्यायचे असते, शक्तिशाली माणूस तो असतो ज्याच्याकडे प्रत्येक सुख सोडण्याची क्षमता असते., असं यात लिहिलं आहे' त्याच्याकडे काही शोधात्मक कादंबर्या आणि मीन काम्फ हे पुस्तकही होते.