Rahul Gandhi statement on Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेच्या (Parliament Security Breach) मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. अधिवेशनात विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. यामुळे दोन दिवस कामकाज होऊ शकले नाही. आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला. तर दुसरीकडे, भारतीय जनता पक्षानेही राहुल यांच्या टीकेवर पलटवार केला आहे.
शनिवारी(16 डिसेंबर) एएनआयशी वृत्तसंस्थेशी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाली, पण असे झालेच कसे? बेरोजगारी ही देशातील सर्वात मोठी समस्या असून संपूर्ण देशच उफाळून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे तरुणांना रोजगार मिळत नाहीय. बेरोजगारी आणि महागाई, हे संसदेच्या सुरक्षिततेच्या कमतरतेचे एक कारण आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण अधिकच तापले आहे.
राहुल गांधी नॉन सीरियस- प्रल्हाद जोशीराहुल गांधींच्या टीकेवर पलटवर करताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, राहुल गांधींचे विधान नॉन सीरिसय आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींना समजून सांगायला हवे. सुरक्षेतील त्रुटींची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनीही जोरदार टीका करत राहुल गांधींवर पलटवार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक योजनांमुळे या देशातून गरिबी, बेरोजगारी हटत असून तरुणांना रोजगार मिळत आहे, याचा विचार राहुल गांधींनी करायला हवा. राहुल गांधी कधी, काय बोलतील याची त्यांनाही कल्पना नाही, अशी टीका त्यांनी केली.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. संसदेत त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीशी संबंधित लोकांनी सभागृहात उड्या मारल्या. ते याचे कारण बेरोजगारी असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्याने लोकांना हसू येतं, अशी टीका त्यांनी केली.
भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींचे विधान रिट्विट करत लिहिले की, राहुल गांधी नेहमीच मूर्खपणाची वक्तव्ये करतात. भारतातील बेरोजगारी 3.2% आहे, जी 6 वर्षातील सर्वात कमी आहे, असे म्हटले.