4 डिसेंबरला सुरू होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन; या विधेयकांवर होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:03 PM2023-11-09T19:03:27+5:302023-11-09T19:04:17+5:30

Parliament Winter Session: संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली.

Parliament Session: Winter session of Parliament to begin on December 4; These bills will be discussed | 4 डिसेंबरला सुरू होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन; या विधेयकांवर होणार चर्चा

4 डिसेंबरला सुरू होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन; या विधेयकांवर होणार चर्चा

Parliament Winter Session: सध्या देशभारत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पण, या निवडणुका झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 4 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. 

हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत चालेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 15 बैठका होणार आहेत. प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून हिवाळी अधिवेशनाची माहिती दिली. 

निवडणुकीनंतर लगेचच हिवाळी अधिवेशन
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. पाचही राज्यांमध्ये 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असून 4 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका, त्यामुळे हे अधिवेशन महत्वाचे असणार आहे.

या विधेयकांवर चर्चा होऊ शकते
गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीने नुकतेच तीन अहवाल स्वीकारले आहेत. त्यानुसार, आयपीसी, सीआरपीसी आणि एव्हिडन्स अ‍ॅक्टची जागा घेणारी तीन महत्त्वाची विधेयके या अधिवेशनात विचारात घेतली जाण्याची शक्यता आहे. संसदेत प्रलंबित असलेले दुसरे मोठे विधेयक, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित आहे.

Web Title: Parliament Session: Winter session of Parliament to begin on December 4; These bills will be discussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.