नवी दिल्लीः संसदेत प्रवेश करणाऱ्या खासदारांचे सरासरी वयोमान ५४ वर्षांचे आहे. सर्वात तरुण खासदाराचे वय २५ आहे, तर सर्वात वृद्ध खासदाराचे वय ८६ आहे. ५१ ते ६५ या वयोगटातील खासदारांचे प्रमाण २0१४ च्या तुलनेत यंदा कमी झाले असले तरी ते यंदा सर्वाधिक म्हणजे ४७ टक्के इतके आहे. ३६ ते ५0 या वयोगटातील खासदारांचे प्रमाण त्याखालोखाल आहे, तर ८१ च्या वयाच्या खासदारांचे प्रमाण अत्यल्प म्हणजे अवघे 0.४ टक्के इतके आहे.गेल्या वेळच्या सभागृहाच्या तुलनेत यावेळी ६५ वयापेक्षा अधिक वय असलेल्या आणि पुन्हा संसदेत निवडून गेलेल्या खासदारांचे प्रमाण अधिक आहे व यात काँग्रेसच्या खासदारांचे प्रमाण जास्त आहे. भाजप खासदारांचे या वयोगटातील प्रमाण हे २५ टक्क्यांवरून १७ टक्के इतके कमी आहे. यंदाच्या लोकसभेत नव्याने प्रवेश करणाºया खासदारांच्या मालमत्तेत अभूतपूर्व वाढ झाली आहे. २0१४ मध्ये खासदारांची सरासरी एकुण मालमत्ता ही २.९२ कोटी इतकी होती. २0१९ मध्ये ती वाढून ४.२२ कोटी इतकी झाली आहे. भाजप आणि काँग्रेस या लोकसभेतील दोन प्रमुख पक्ष असलेल्या खासदारांच्या मालमत्तेवर नजर टाकल्यास २0१४ मध्ये भाजपच्या खासदारांची मालमत्ता २.६९ कोटीवरुन ४.0१ कोटी इतकी वाढली आहे तर काँग्रेसच्या खासदारांची मालमत्ता ४.८४ कोटीवरुन ५.४२ टक्के इतकी वाढली आहे.
>खासदारांची शैक्षणिक पात्रतागत निवडणूकीची तुलना करता २0१९ मध्ये लोकसभेत प्रवेश केलेले सर्वाधिक खासदार हे पदवीधर असल्याचे दिसून येते.२0१४ मध्ये ११८ खासदार पदवीधर होते. त्या तुलनेत २0१९ मध्ये १३३ खासदार पदवीधर आहेत. म्हणजे हे प्रमाण २१ टक्क्यावरुन २४ टक्के इतके वाढलेले आहे.असे असले तरी २0१४ आणि २0१९ ची तुलना करता नव्या संसदेत प्रवेश करणाऱ्या खासदारांच्या शैक्षणिक पात्रतेत फारसा बदल झालेला नाही.