- हरिश गुप्तानवी दिल्ली : संसदेचे कामकाज १४ दिवसांपासून होत नसल्याने व कामकाजाचे नऊ दिवसच शिल्लक असल्याने सरकारने ही कोंडी फोडण्यासाठी विरोधकांशी संपर्क साधण्याचे संकेत दिले. लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील व सोमनाथ चॅटर्जी यांनी टीका केल्यानंतर सरकारने पुढाकार घेतला आहे.गेल्या दोन आठवड्यांत राज्यसभा व लोकसभेचे कामकाज काही मिनिटांत गुंडाळावे लागल्यामुळे वातावरण निवळण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, यासाठी दडपण वाढत आहे. संसदेतील सध्याच्या कोंडीला सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सरकार कोणत्याही पक्षाशी संपर्क साधत नाही, असा आरोप केलाआहे.वाईट प्रघात नकोअविश्वास प्रस्तावावर चर्चा होऊ न देता संसद अनिश्चित काळासाठी सरकार तहकूब होऊ देणार नाही, असे कळते. तो वाईट प्रघात पडेल. इतर विषयापेक्षा अविश्वास प्रस्ताव आधी विचारात घेतला जातो. त्यावरील चर्चेपासून सरकार दूर पळत आहे अशी प्रतिमा निर्माण व्हावी, असे सरकारला वाटत नाही.भाजपा खासदारांची आज बैठकटीडीपीच्या नेत्यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. शुक्रवारी भाजपा खासदारांच्या नव्या मुख्यालयात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व इतर या बैठकीत बोलतील.संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल म्हणाले की, कोंडी फोडण्यासाठी सरकार काँग्रेस, टीडीपी व एआयएडीएमकेशी संपर्क साधेल. आपण आझाद यांना भेटायला गेलो. परंतु, आझाद बाहेर असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली नाही.ग्रॅच्युइटी विधेयक मंजूरराज्यसभेत गोंधळ सुरू असूनही सरकारी कर्मचाºयांच्या करमुक्त ग्रॅच्युइटीची मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचे दुरुस्ती विधेयक सभापती व्यंकय्या नायडू यांच्या शिष्टाईमुळे मंजूर झाले. त्यांनी विरोधी नेत्यांची भेट घेऊन कर्मचाºयांच्या हिताचे हे विधेयक मंजूर होऊ द्यावे, असे आवाहन केले. त्यामुळे सभागृहात गोंधळ सुरू असतानाच हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले.
संसदेतील कोंडी फुटण्याची चिन्हे, संसदीय मंत्र्यांनी ठोठावले काँग्रेसचे दार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 4:07 AM