नवी दिल्ली : संपुआ सरकारच्या कार्यकाळात अगुस्ता वेस्टलँड कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले होते, या काँग्रेसच्या दाव्याला संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आव्हान दिले आहे. इटलीच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करून सात-आठ दिवसानंतर प्रतिक्रिया देऊ, असे ते म्हणाले. माजी संरक्षणमंत्री व काँग्रेसचे नेते ए. के. अँथनी यांनी मात्र मनोहर पर्रीकर आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि मोदी सरकारला १0 प्रश्न विचारले.ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या कंपनीला मेक इन इंडियामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि त्यासाठी त्या कंपनीला काळ्या यादीतून काढण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. स्वत:ची कृती जनतेसमोर येउ नये, यासाठीच काँग्रेसवर भाजपा नेते खोटे आरोप करीत असल्याची टीकाही अँथनी यांनी केली. या हेलिकॉप्टर सौद्याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि जे कोणी दोषी आढळतील, त्यांना खुशाल तुरुंगात टाकावे. >ते १० प्रश्न४बंदी घातलेल्या कंपनीवरील प्रतिबंध का उठवण्यात आला? सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाने या कंपनीविषयी प्रतिकुल मत व्यक्त केले असतानाही कंपनीला मेक इन इंडियामध्ये सहभागी करून घेण्यासाठी अॅटर्नी जनरलचे मत का मागवले? नौदलासाठी २0१५ साली अगुस्ता वेस्टलँडची हेलिकॉप्टर्स का वापरण्यात आली? ही कंपनी आणि टाटा समूह यांच्या संयुक्त गुंतवणुकीला एफआयपीबीने २0१४ साली मंजुरी का दिली? आपली सीबीआयने चौकशी करावी, असा प्रस्ताव जेम्स खिस्तियनने केला, तेव्हा तो का अमान्य करण्यात आला? केरळमधील मच्छिमारांच्या मृत्यूस जबाबदार इटलीच्या खलाशांच्या सुटकेच्या बदल्यात काँग्रेस नेत्यांना अडकावण्याबाबत समझोता झाला, हे खरे आहे का? राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्ती रमणसिंग यांनी या कंपनीशी व्यवहार केल्याने झालेल्या नुकसानाबाबत कॅगने ठपका ठेवला असताना त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली? असे ते १० प्रश्न आहे.
पर्रीकर यांचे काँग्रेसला आव्हान
By admin | Published: April 28, 2016 1:51 AM