मध्य प्रदेशातील खरगोन येथील दंगलीशी संबंधित एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या दंगलींमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. दंगलग्रस्तांची तक्रार ऐकून न्यायाधिकरणाने एका 12 वर्षीय मुलाला नोटीस बजावली आहे. यामध्ये दंगलीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी 2.9 लाखांचा दंडही ठोकला आहे. दंगलीच्या वेळी आरोपी मुलगा 11 वर्षांचा होता. मुलावर तोडफोड आणि जाळपोळ केल्याचा आरोप आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये एका महिलेने मध्य प्रदेश प्रिव्हेंशन अँड रिकव्हरी ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत स्थापन केलेल्या न्यायाधिकरणाकडे तक्रार केली होती. दंगलीत तिच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप महिलेने केला होता. यानंतर महिलेच्या तक्रारीवरून मुलगा आणि इतर सात जणांना नोटीस बजावली.
रामनवमीला हिंसाचारमध्य प्रदेशातील खरगोनमध्ये यावर्षी रामनवमीच्या दिवशी दोन समुदायांमध्ये वाद होऊन दंगल उसळली होती. या दंगलीत नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. याची भरपाई करण्यासाठी मध्य प्रदेश प्रिव्हेंशन अँड रिकव्हरी ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. यानंतर दंगलीला बळी पडलेल्या एका महिलेने ऑगस्ट महिन्यात येथे तक्रार दाखल केली होती. यानंतर मुलासह सात जणांना नोटीस बजावण्यात आली.
2.9 लाख रुपये दंडया नोटीसमध्ये मुलाचे वयही नमूद करण्यात आले आहे. यासोबतच त्याच्यावर 2.9 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एनबीटीच्या अहवालानुसार, न्यायाधिकरणाचे सदस्य प्रभात पाराशर यांनी सांगितले की, ही कारवाई नियमांनुसार करण्यात आली आहे. हा फौजदारी खटला असता तर बालकाला बाल न्याय कायद्याचे संरक्षण मिळाले असते. म्हणून आम्ही फक्त दंडात्मक कारवाई केली आहे. मुलाच्या पालकांनी याबाबत जबाबदारी घेतली असल्याने, ते पैशांची भरपाई करणार आहेत.