नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकांत झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) व काँग्रेस आघाडीला मिळालेला विजय म्हणजे समाजात जाती-पाती, धर्माच्या आधारे फूट पाडण्याचे प्रयत्न करणाºया भाजपचा जनतेने केलेला पराभव आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.
झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीवर विश्वास दाखविल्याबद्दल त्या राज्यातील जनतेचे सोनिया गांधी यांनी आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळाल्याबद्दल त्यांनी हेमंत सोरेन, तसेच राज्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. सोनिया गांधी यांनी सांगितले की, भाजप व त्याच्या विद्वेषी भूमिकेचा झारखंड विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्याने हा विजय खास व सद्य:स्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे. जातीपाती, धर्माच्या आधारे समाजामध्ये फूट पाडणाºया या पराभवामुळे अद्दल घडली आहे.
मतांमध्ये घट होऊनही झामुमोचे ११ आमदार जास्तझारखंड मुक्ती मोर्चाला यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमध्ये २०१४ च्या तुलनेत जवळपास दोन टक्के घट झाली आहे तरीही तो यंदा ११ जागा जास्त जिंकून ८१ सदस्यांच्या विधानसभेत सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष बनला आहे.दुसºया बाजूला भाजपची मते २०१४ च्या तुलनेत दोन टक्के वाढली आहेत तरीही त्याचे आमदार ३७ (२०१४) वरून २५ वर आले. २०१४ मध्ये झामुमोने १९ जागा जिंकल्या होत्या, त्या यंदा ३० झाल्या. तीन पक्षांच्या आघाडीच्या सरकारचे नेतृत्व झामुमो करणार आहे.भाजपने २०१४ मध्ये ३१.२६ टक्के मते मिळवली होती व ती यंदा ३३.३७ टक्क्यांवर गेली.