- शीलेश शर्मा, नवी दिल्लीसोनिया गांधी यांना पक्षाध्यक्षपदाला वर्षभरासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने मंगळवारच्या बैठकीत घेतल्यामुळे तूर्तास राहुल गांधी यांची अध्यक्षपदी होणारी ताजपोशी लांबणीवर पडली आहे. पक्षघटनेत महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्यासाठी आणखी वेळ हवा असल्याने वर्षभर संघटनात्मक निवडणुका लांबणीवर टाकण्याचा ठरावही कार्यकारिणीने पारित केला. आत्मचिंतन सुटी संपवून परतल्यानंतर राहुल यांच्याकडे अध्यक्षपद सोपविले जाणार असल्याचे तर्कवितर्क सुरू झाल्यानंतर हा मुद्दा कायम बातम्यांचा विषय बनला होता.काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका यंदाऐवजी डिसेंबर २०१६पर्यंत पूर्ण करण्यामागे घटनात्मक बदलाचे कारण पक्षाने दिले आहे. मोदी यांना जोरदार टक्कर देण्यास...देशातील सध्याची राजकीय परिस्थिती हे दुसरे मोठे कारण मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टक्कर द्यायची झाल्यास काँग्रेसला अंतर्गत संघटन मजबूत करतानाच अन्य समविचारी राजकीय पक्षांचा पाठिंबाही हवा आहे. हे केवळ सोनिया यांच्या नेतृत्वातच शक्य असल्याचे मानणारा वर्ग पक्षात मोठा आहे. भाजपाविरुद्ध अनेक पक्ष एकजूट दाखविण्यास तयार आहेत; मात्र ते राहुल यांचे नेतृत्व सहजपणे स्वीकारणार नाहीत. त्यामुळेच राजकीय नुकसान सोसावे लागेल असे कोणतेही पाऊल उचलण्याच्या मन:स्थितीत काँग्रेस नाही.
पक्षधुरा सोनियांकडेच
By admin | Published: September 09, 2015 5:16 AM