हाथरस - दहावी आणि १२ वीच्या परीक्षांची भीती विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच असते. या परीक्षेच्या तणावातून आणि भीतीतून अनेकदा विद्यार्थी टोकाचं पाऊलही उचलतात. मात्र, काही विद्यार्थी मजेशीर व बिनधास्तपणे या परीक्षांना सामोरे जातात. अनेकदा अशा विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकांनाही अवाक् होतं. परीक्षा काळात विद्यार्थ्यांची कॉपी हाही चर्चेचा विषय असतो. त्यासाठी, कॉपीमुक्त अभियानही सरकारतर्फे राबविण्यात येते. मात्र, तरीही कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांमुळे शाळा आणि कॉलेजची बदनामी होते. बिहार आणि उत्तर प्रदेशातील परीक्षा ह्या कॉपीमुळेच केंद्रीत असतात.
महाराष्ट्रातही यंदा कॉपीमुक्त परीक्षा अभियान चालवण्यात आले. मात्र, या व्हॉट्असपवर प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याप्रकरणी प्राचार्यावरच गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे, रोखण्यासाठी सरकारला कडक पाऊलं उचलावीच लागतील. दरम्यान, आपल्याला काहीही करुन परीक्षेत पास व्हायचंय एवढाच चंग विद्यार्थ्यांचा असतो. कुणाला घरच्यांसाठी, कुणाला नातवाईकांसाठी तर कुणाला लोकं काय म्हणतील म्हणून पास व्हायचे असते. त्यासाठी, काहीही करण्याची विद्यार्थ्यांची तयारी असते. अनेकदा उत्तर पत्रिकेत उत्तरं लिहिण्याऐवजी भावनिक पत्रही लिहिले जाते.
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील परीक्षांची पेपर तपासणी सुरू आहे. त्यात, एका विद्यार्थीनीने उत्तर पत्रिकेत लिहिलेले उत्तर वाचून शिक्षकही अवाक् झाले आहेत. समाजशास्त्र विषयाच्या या उत्तर पत्रिकेत विद्यार्थीनीने शिक्षकांकडे मला पास करा, अशी विनंती केलीय. गुरुजी, मला पास करा, माझं लग्न होणार आहे. जर पास झाले तर सासरी माझी लाज राहिल. तर, आणखी एका विद्यार्थ्यानेही भावनिक उत्तर लिहलंय. गुरुजी, कृपया मला पास करा, मी एका हाताने दिव्यांग आहे, वडिलांचे निधन झाले आहे. मला जर तुम्ही पास नाही केलं तर माझं करियर खराब होईल.
दरम्यान, विद्यार्थ्यांची ही उत्तर पत्रिका पाहून शिक्षकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. सध्या युपी बोर्डातील दहावीच्या विद्यार्थ्यांची पेपर तपासणी सुरू आहे.