पत्त्यासाठी पासपोर्टचा वापर करता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:43 AM2018-01-15T01:43:02+5:302018-01-15T01:43:31+5:30
पासपोर्टचा वापर आता पत्त्याच्या पुराव्यासाठी करता येणार नाही. कारण, सर्व प्रकारच्या पासपोर्टमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
नवी दिल्ली : पासपोर्टचा वापर आता पत्त्याच्या पुराव्यासाठी करता येणार नाही. कारण, सर्व प्रकारच्या पासपोर्टमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
नवा पासपोर्ट आता नारंगी आणि निळ्या रंगात येणार असून शेवटचे पान कोरे ठेवण्यात येणार आहे. याच पानावर पासपोर्टधारकांचा पत्ता असतो.
नव्या रंगाचे पासपोर्ट
सद्याच्या पासपोर्टवर वडील, आई, पती अथवा पत्नी यांचे नाव, पत्ता आवश्यक आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पासपोर्टचे शेवटचे पान आता प्रकाशित होणार नाही. बदलण्यात येणाºया पासपोर्टमध्ये ईसीआर (इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड) वर्गात येणाºया व्यक्तींसाठी नारंगी रंगाचा पासपोर्ट देण्यात येणार आहे.
नाशिकमधील भारतीय सुरक्षा प्रेस नवे पासपोर्ट तयार करणार आहे. सद्याचे पासपोर्ट ठरवून दिलेल्या तारेखेपर्यंत वैध असतील.
नारिंगी पासपोर्ट म्हणजे भाजपाची भेदभावाची मानसिकता
नवी दिल्ली : नारिंगी रंगाचा पासपोर्ट म्हणजे भाजपची भेदभावाची मानसिकता दिसते. सरकार भारतातील स्थलांतरित कामगारांना ‘सेकंड क्लास सिटिझन’सारखी वागणूक देते, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.