कोरोना महामारीच्या उद्रेकानंतर, अनेक देशांनी त्यांच्या व्हिसा आणि पासपोर्टमध्ये अनेक बदल केले आहेत. या बदलांचा परिणाम त्यांच्या पासपोर्टवरही झाला आहे. दरम्यान, जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्टची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, जपान आणि सिंगापूरकडे सध्या जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्ट आहेत, तर पाकिस्तान आणि उत्तर कोरियाकडे सध्या जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट आहेत. (The world’s most powerful passports in 2021: Here is where India stands)
World Most Powerful Passport 2021 च्या रँकिंगनुसार, भारत बुर्किना फासो, ताजिकिस्तानसह 90 व्या स्थानावर आहे. हेनले अँड पार्टनर्सने जगातील पॉवरफुल देशाच्या पासपोर्टचे रँकिंग जाहीर केले आहे. या रँकिंगनुसार, या देशांचे पासपोर्टधारक व्हिसाशिवाय 58 देशांमध्ये प्रवेश करू शकतात.
हेनले पासपोर्ट इंडेक्सने जगातील सर्व पासपोर्टला क्रमांक देते, जे पासपोर्टधारक व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात. मात्र, हेनले पासपोर्ट इंडेक्सने कोविड -19 मुळे जगातील अनेक देशांनी लादलेली तात्पुरती प्रवास बंदी विचारात घेतली नाही.
हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार, जपान आणि सिंगापूरचा स्कोअर 192 आहे आणि ते सर्वात वर आहेत. याचा अर्थ असा की या देशांचे पासपोर्टधारक जगातील 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. त्याचवेळी, पाकिस्तान, इराक, येमेन, अफगाणिस्तान सारख्या देशांचे पासपोर्ट सर्वात कमी पॉवरफुल आहेत.
'हे' आहेत 10 पॉवरफुल पासपोर्ट असलेले देश- जपान, सिंगापूर (स्कोअर - 192)- जर्मनी, दक्षिण कोरिया (स्कोअर - 190)- फिनलँड, इटली, लक्समबर्ग, स्पेन (स्कोअर - 189)- ऑस्ट्रिया, डेन्मार्क (स्कोअर - 188)- फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वीडन (स्कोअर - 187)- बेल्जियम, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड (स्कोअर - 186)- चेक प्रजासत्ताक, ग्रीस, माल्टा, नॉर्वे, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स (स्कोअर - 185)- ऑस्ट्रेलिया, कॅनडा (स्कोअर - 184)- हंगेरी (स्कोअर - 183)- लिथुआनिया, पोलंड, स्लोव्हाकिया (स्कोअर - 182)