जर तुम्हाला पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज (Online Passport Apply) करायचा असले तर एक सोपी पद्धत आहे. जर तुम्ही घरबसल्या पासपोर्टसाठी अर्ज करू इच्छित असाल तर या सोप्या पद्धतींनी तुम्ही पासपोर्ट तयार करू शकता. या नव्या पद्धतीनं तुमच्या घरी केवळ सात दिवसांमध्ये पासपोर्ट मिळेल. परंतु पासपोर्टची फी भरण्यापूर्वी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल.
पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पासपोर्टच्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. सर्वप्रथम https://portal2.passportindia.gov.in/AppOnlineProject/user/RegistrationBaseAction यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट ऑफिस निवडावं लागेल. त्यानंतर पासपोर्ट ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्हाला राज्य निवडावं लागेल. यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल. हा फॉर्म अतिशय सांभाळून भरा.
चूक करू नकाजर फॉर्ममध्ये कोणतीही चूक झाली, तर ती तुमच्या पासपोर्टमधील चूक असते. पासपोर्टमध्ये चूक झाल्यास तुमची फाईल फेटळाली देखील जाऊ शकते. दरम्यान, तुम्ही जी काही माहिती भराल ती तुमच्या पासपोर्टमध्येही असायला हवी. दस्तऐवज व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या पासपोर्ट ऑफिसमध्येही जावं लागलं. त्या ठिकाणी तुमचे दस्तऐवज आणि फॉर्म व्हेरिफाय केला जातो.
जर तुम्हाला लवकर पासपोर्ट हवा असेल तर तुम्हाला तात्काळ पासपोर्ट अप्लाय करायला लागलतो. हा सामान्य कालावधीत येणाऱ्या पासपोर्टपेक्षा जलद मिळतो. व्हेरिफिकेशननंतर हा पासपोर्ट लवकरच डिलिव्हर केला जातो. हा पासपोर्ट मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक शुल्क द्यावं लागतं. दोन्ही प्रकारचे पासपोर्ट व्हेरिफिकेशनंतरच जारी करण्यात येतात. व्हेरिफिकेशनदरम्यान, तुम्हाला सर्व दस्तऐवज दाखवावे लागतात. तात्काळ पासपोर्ट तुम्हाला सात दिवसांमध्ये तुमच्या घरच्या पत्त्यावर मिळतो. सामान्य पासपोर्टसाठी तुम्हाला १५०० रूपये शुल्क द्यावं लागतं.