शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
3
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
4
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
5
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
6
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
7
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
8
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
9
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
10
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
11
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
12
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
13
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
14
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
15
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
16
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
17
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
18
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
19
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
20
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर

चूक असेल तर 1000 कोटींचा दंड करा, फाशी द्या; SC च्या सूचनेवर काय म्हणाले बाबा रामदेव?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 6:28 PM

...तर आम्हाला 100 ऐवजी 1000 कोटी रुपयांचा दंड करा. आम्हाला फाशीची शिक्षाही द्या, स्वीकार आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. ते बुधवारी हरिद्वारमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.

अ‍ॅलोपॅथीवर निशाना साधण्यावरून आणि औषधांसंदर्भात खोटे दावे केल्याच्या आरोपांवरून सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला ताकीद दिली होती. एवढेच नाही, तर आजार बरा करण्यासंदर्भातील आपल्या प्रोडक्ट्सचा दावा खोटा आढळून आला, तर 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर न्यायालयाने ही टिप्पणी केली होती. यानंतर आता बाबा रामदेव यांनी याप्रकरणावर भाष्य केले आहे. जर आम्ही चुकीचे आढळलो तर आम्हाला 100 ऐवजी 1000 कोटी रुपयांचा दंड करा. आम्हाला फाशीची शिक्षाही द्या, स्वीकार आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. ते बुधवारी हरिद्वारमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.

बाबा रामदेव म्हणाले, 'खोटा प्रचार कराल तर कोट्यवधी रुपयांचा दंड भरावा लागेल, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानेपतंजलीला फटकारले आहे, अशा आशयाचे वृत्त कालपासून माध्यमांच्या हजारो साइट्सवर व्हायरल केले जात आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालय आणि देशाच्या संविधानाचा आदर करतो. मात्र आम्ही खोटा प्रचार करत नाही. डॉक्टरांच्या एका टोळीने एक अशी संघटना तयार केली आहे की, जी अपप्रचार करते. ते आपल्या संस्कृती आणि शाश्वत मूल्यांच्याही विरोधात बोलतात. बीपी, शुगर, थायरॉइड आणि लिव्हरसारख्या आजारांवर कसलाच इलाज नाही, असा त्यांचा खोटा प्रचार आहे. मात्र आमच्याकडे हजारो रुग्ण येतात. आमच्याकडे त्यांच्यावर जे काही केले गेले त्याचे पुरावेही आहेत. आम्ही तर एका आठवड्यात 12 ते 15 किलोपर्यंत वजनही कमी करतो.'

राम देव म्हणाले, जर आम्ही खोटे बोलत नसू, तर जे खोटा प्रचार करत आहेत, त्यांना हा दंड करायला हवा. गेल्या 5 वर्षांपासून जबरदस्त प्रचार सुरू आहे. योग, आयुर्वेद आणि नॅच्युरोपॅथीला खोटे ठरवण्यासाठी, आयुर्वेदात कशाचाही इलाज नाही, असा प्रचार सुरू आहे. खरे तर बाबा रामदेव यांच्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाच्या खंडपीठाने पतंजलीला खोटी प्रसिद्धी टाळण्याचा सल्ला दिला होता.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय