Pathaan Movie : शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण सिनेमात 'बेशरम रंग' गाण्यात फारच रंग उधळले आहेत असेच वाटते. बिकीनीच्या रंगांवरुन वाद चांगलाच पेटत चाललाय. भगव्या बिकीनीमुळे अयोध्येचे महंत यांनी सिनेमा थिएटरच जाळण्याची गोष्ट केली आहे. हिंदूंनी केलेला विरोध हा भगव्या बिकीनीमुळे ओढावला आहे पण आता तर मुस्लिम संघटनेनेही पठाणला विरोध केलाय. आता मुस्लिम संघटनेचा नेमका आक्षेप तो काय ?
उलेमा बोर्डाचे (Ulema Board) अध्यक्ष सैय्यद अनस अली यांनी पठाण वर आक्षेप घेतला आहे. पठाण देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भुमिका उलेमा बोर्डाने घेतली आहे. सैय्यद अनस अली एएनआयशी बोलताना म्हणाले, 'या चित्रपटाने मुस्लिम समाजीचीही भावना दुखावली आहे. या सिनेमाला केवळ मध्य प्रदेशच नाही तर पूर्ण देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही. मुस्लिम समाजात पठाण खूप प्रतिष्ठित आहेत. यातून केवळ पठाणांची नाही तर संपूर्ण मुस्लिम समाजाला बदनाम केले जात आहे. पठाण चित्रपटाचे नाव आणि त्यात महिलांचा अश्लील डान्स हे खपवून घेतले जाणार नाही.'
पठाण हे नाव काढून टाका
सैय्यद अनस अली म्हणतात, 'मेकर्सने पठाण हे नाव काढून टाकले पाहिजे. शाहरुखला त्याच्या भुमिकेचे नाव बदलावे लागेल. त्यानंतर पाहिजे ते करा. पण आम्ही हा चित्रपट देशात रिलीज होऊ देणार नाही. आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि एफआयआर सुद्धा करु. रिलीज थांबवण्यासाठी सगळं काही करु.'
मुस्लिम धर्माचे नाव खराब करण्याची परवानगी कोणालाही नाही
ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटीनेही (AIMTC) पठाण ला विरोध केला आहे. कमिटीचे अध्यक्ष पीरजादा खुर्रम मिया चिश्ती विरोध करताना म्हणाले, पठाण मधून मुस्लिमांच्या भावना भडकवल्या जात आहेत. मला २४ तासाच्या आत ४०० हून जास्त फोन आले आणि हा सिनेमा मुस्लिमविरोधात आहे असे सांगण्यात आले. सर्वात जास्त फोन बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकआणि तेलंगाणा मधून आलेत. मुस्लिम धर्माची प्रतिमा मलीन करण्याची करण्याची परवानगी कोणालाही नाही. मग तो शाहरुख खान असो किंवा अजून कोणी असो.'
'पठाण' सिनेमा नववर्षात २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं प्रदर्शित झालं. यात दीपिकाचा बोल्ड लुक पाहायला मिळत आहे. मात्र सध्या सिनेमावलर बॉयकॉटची टांगती तलवार आहे.