ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १२ - पठाणकोट हल्ल्यातील दहशतवादी शोधण्याच्या नावाखाली आपल्या घराची झाडाझडती पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी घेतल्याचे न्यू यॉर्क टाइम्सच्या पत्रकाराने म्हटले आहे. सलमान मसूद असे या पत्रकाराचे नाव असून तो न्यू यॉर्क टाइम्सचा पाकिस्तानमधील विदेश प्रतिनिधी आहे.
वरीष्ठ पोलीस अधिका-यांना घराच्या झडतीबद्दल मसूदने विचारणा केली. त्यावेळी पाकिस्तानी पोलीस अधिका-यांनी भारतातल्या पठाणकोट येथे २ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यामागील दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे व त्यादृष्टीनेच ही झडती घेतल्याचे म्हटले आहे.
आत्तापर्यंत पाकिस्तानने अनेक ठिकाणी धाडी घातल्या असून काही जणांना ताब्यातही घेतल्याचे वृत्त आहे. मसूद यांनी पाकिस्तानी सुरक्षा अधिका-यांचे वर्दीतले फोटोही ट्विटरवर टाकले आहेत. माझ्या घरात बेकायदेशीर हत्यार आहे का याची विचारणा त्यांनी केल्याचे मसूद यांनी म्हटले आहे.
Rangers say it's a "routine search operation" pic.twitter.com/ItZQAi7mjG— Salman Masood (@salmanmasood) January 12, 2016
Rangers troops back,along with a senior officer. Hope they find the terrorist pic.twitter.com/ZiAk8tTFZ8— Salman Masood (@salmanmasood) January 12, 2016