इस्लामाबाद : पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानने पाचसदस्यीय संयुक्त तपास पथकाची (जेआयटी) स्थापना केली आहे. या हल्ल्यात पाकमधील जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा भारताचा आरोप आहे. पठाणकोट हल्लाप्रकरणी पाकने आठवडाभरापूर्वी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता. पंजाब प्रांताचे दहशतवाद प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक मोहंमद ताहिर राय हे जेआयटीचे समन्वयक आहेत. हे पथक पुरावे गोळा करण्यासाठी मार्चमध्ये पठाणकोटला भेट देऊ शकते. (वृत्तसंस्था)
पठाणकोट हल्ला; तपासासाठी पाकमध्ये एसआयटी
By admin | Published: February 27, 2016 1:35 AM