नवी दिल्ली : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेल्याची पुष्टी करणारे पुरावे अमेरिकेने भारताला दिले आहे. एनआयएने जैश ए मोहंमदचा मसूद अझहरविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याच्या पर्यायाची चाचपणी करीत असतानाच ही घडामोड घडली. हल्ल्याचे सूत्रधार असलेले जेईएमचे दहशतवाद्यांच्या फेसबुक अकाऊंटचे आणि संघटनेची आर्थिक शाखा असलेल्या अल रहमत ट्रस्टच्या वेबसाईटचे आयपी अॅड्रेसेस पाकिस्तानमधील असल्याची माहिती अमेरिकेने एनआयएला दिली आहे. जैशचा दहशतवादी कासिफ जान याचे मित्र फेसबुकवरील जिहाद, जेईएमशी संबंधित ग्रुपचे सदस्य असून या ग्रुपच्या पानावर पठाणकोट हल्ल्यात मारले गेलेल्या चार दहशतवाद्यांचे फोटो आहेत. हल्ल्याच्यावेळी अल रहमत ट्रस्टचे वेबपेज रंगोनूर डॉट कॉम व अलकआलम आॅनलाईन डॉट कॉम या वेबसाईटरवर अपलोड केले होते. तारिक सिद्दीकी या दोन्ही साईट्चे काम पहातो. रफाह ए आलम सोसायटी, मालिर, कराची असा या वेबसाईट्सचा पत्ता आहे.
पठाणकोट हल्ला पाकमधूनच झाला!
By admin | Published: August 30, 2016 4:31 AM