इस्लामाबाद : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करीत असलेले पाकिस्तानचे पथक आठवडाभरात आपला तपास पूर्ण करणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी येथे दिली. या प्रकरणी तीन संशयित सध्या पोलीस कोठडीत आहेत. पठाणकोटप्रकरणी संयुक्त चौकशी पथक (जेआयटी) या आठवड्यात आपला तपास पूर्ण करील, असे पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहारविषयक विशेष सहायक सईद तारिक फातेमी यांनी म्हटल्याचे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे. पाकिस्तानने गेल्या आठवड्यात पाच सदस्यीय जेआयटीची स्थापना केली होती. तत्पूर्वी या हल्ल्याबाबत पाकच्या पंजाब प्रांतात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला होता. जैश ए मोहंमदचा प्रमुख मसूद अझहर याने हा हल्ला घडवून आणल्याचा भारताचा आरोप आहे. तथापि, पाकने एफआयआरमध्ये अझहर, तसेच त्याची संघटना जैशचा उल्लेख केलेला नाही. (वृत्तसंस्था)
पठाणकोट; पाकचा तपास आठवडाभरात पूर्ण होणार
By admin | Published: March 01, 2016 3:09 AM