शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अनोखं प्रेम! ...म्हणून 'त्याने' मुलाला बेदखल करत हत्तींच्या नावावर केली तब्बल 5 कोटींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 10:05 AM

Akhtar Imam 5 Crore Property to his Elephants : अख्तर यांनी आपल्या मुलाला जमीन आणि संपत्तीतून बेदखल केलं आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी आपली सगळी संपत्ती आपल्याकडे असणाऱ्या दोन हत्तींच्या नावावर केली आहे.

नवी दिल्ली - सध्याच्या जगात काळ-वेळ बदलली की माणसं देखील बदलतात. गरजेच्या वेळीच आपली साध सोडतात. मात्र प्राण्यांच्या इमानदारीची अनेक उदाहरण आपण ऐकली आहे. एकदा माणसाने त्यांना जीव लावला की ते त्याची साथ कायम देतात. अशीच एक घटना बिहारच्या पाटणामध्ये पाहायला मिळाली आहे, आपल्या मुलाला संपतीतून बेदखल करत एका व्यक्तीने तब्बल पाच कोटींची संपत्ती ही हत्तींच्या नावावर केल्याची घटना समोर आली आहे. पाटणाजवळील दानापूरच्या जानीपूर परिसरात राहाणाऱ्या अख्तर इमाम असं या व्यक्तीचं नाव आहे. अख्तर यांनी सर्व लोक हाथी काका या नावानंच ओळखतात. या नावामागची कथाही अतिशय रंजक आहे.

अख्तर यांनी आपल्या मुलाला जमीन आणि संपत्तीतून बेदखल केलं आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी आपली सगळी संपत्ती आपल्याकडे असणाऱ्या दोन हत्तींच्या नावावर केली आहे. मुलाला बेदखल करुन आता नऊ महिने झाले आहेत, मात्र अख्तर यांना कधीच एकटं असल्यासारखं वाटत नाही. कारण मुलापेक्षा त्यांचा हत्तींवर जास्त विश्वास आहे. याच कारणामुळं लोक त्यांना हाथी काका म्हणतात. अख्तर यांच्याकडे दोन हत्ती आहेत. एकाचं नाव राणी तर दुसऱ्याचं नाव मोती आहे. अख्तर यांचा संपूर्ण दिवस याच दोघांसोबत जातो. आपली पाच कोटींची जमीन हत्तींच्या नावावर केल्यानंतर अख्तर लोकप्रिय झाले.

आपल्या संपत्तीचं विभाजन हाथी काकांनी दोन भागात केलं आहे. पहिला हिस्सा त्यांनी पत्नीच्या नावावर केला आहे. तर दुसऱ्या हिस्सा हत्तींच्या नावावर केला आहे. जर उद्या मी राहिलो नाही तर माझं घर, बँक बॅलन्स, जमीन आणि सगळी संपत्ती हत्तींची होईल. हत्तींना काही झाल्यास त्यांच्या वाट्याची संपत्ती ऐरावत संस्थेला मिळेल असं काकांनी म्हटलं आहे. तसेच त्यांचं जीवन हत्तींनाच समर्पित आहे. हे हत्तीदेखील त्यांच्यासाठी एखाद्या जोडीदारापेक्षा कमी नाहीत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अख्तर यांना आपल्या एकुलत्या एका मुलाला संपत्तीतून बेदखल केल्याचं जराही दुःख नाही. 

"मुलगा मिराज उर्फ पिंटू नालायक निघाला. त्याने मला आपल्या प्रेयसीच्या बलात्कार प्रकरणात खोट्या केसमध्ये अडकवलं होतं. यामुळं मला तुरुंगातही जावं लागलं होतं. तपासादरम्यान हे आरोप खोटे सिद्ध झाले आणि माझी सुटका झाली. मुलाने माझ्या हत्तींना मारण्याचाही प्रयत्न केला मात्र तो पकडला गेला. यानंतर मी हत्तींच्या नावावर संपत्ती करण्याचा निर्णय घेतला" अशी माहिती अख्तर यांनी दिली आहे. तसेच एकदा दोन लोक हत्यारं घेऊन त्यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी हत्तींनीच मोठमोठ्यानं आवाज करत आसपासच्या लोकांना उठवलं. हा आवाज ऐकून हत्यारं घेऊन आलेल्या दोघांनी पळ काढला आणि माझा जीव वाचवला असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :BiharबिहारIndiaभारत