नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना तपासणी केंद्रावर मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात किट अडकल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अर्ध्या तासात महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महिलेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. कोणत्यातरी आजारामुळे मृत्यू झाला असेल असं म्हटलं आहे. या घटनेने गावात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. राम बहाद्दूर दास यांची 65 वर्षीय पत्नी जासो देवी यांचा मृत्यू झाला आहे. राम बहाद्दूर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी कोरोना लस घेण्यासाठी गेली होती. मात्र लस घेण्याआधी तिला कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आलं. त्यावेळी जेव्हा त्यांच्या तोंडामध्ये तपासणीसाठी किट घालण्यात आलं तेव्हा ते गळ्यामध्येच अडकून राहीलं.
जासो देवी यांना यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आणि त्या तिथेच बेशुद्ध पडल्या. यानंतर तातडीने डॉक्टरांना याबाबत माहिती देण्यात आली. डॉ. कमलेश कुमार यांनी कोरोना टेस्ट दरम्यान महिलेच्या गळ्यात किट अडकल्यामुळे मृत्यू झालेल्या गोष्टीला नकार दिला आहे. अशाप्रकारे घटनाच घडली नसल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
धोका वाढला! सणसमारंभाच्या काळात डेल्टा व्हेरिएंटचा कहर?; येणारे 3 महिने ठरू शकतात घातक
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं. त्यामुळे या काळात लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेतचं आहे. घरच्या घरीच सण साजरे करा. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आगे. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.