शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

पाटणा: 'दृश्यम'पासून प्रेरणा घेऊन त्याने नष्ट केले खुनाचे पुरावे

By admin | Published: February 05, 2016 5:51 PM

अभिनेता अजय देवगणच्या 'दृश्यम' या सुपरहिट चित्रपटातून प्रेरणा घेऊन बिहारमधील एका ३८ वर्षीय इसमाने खुनाचे सर्व पुरावे नष्ट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ५ - अभिनेता अजय देवगणच्या 'दृश्यम' या सुपरहिट चित्रपटातून प्रेरणा घेऊन बिहारमधील एका ३८ वर्षीय इसमाने खुनाचे सर्व पुरावे नष्ट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिहारमधील वैशाली येथील रहिवासी असलेल्या रजनीश सिंगला पोलिसांनी हत्येच्या एका आठवड्यानंतर अटक केली. लग्नाचा तगादा लावल्याप्रकरणी आपण सृष्टी या तरूणीचा खून करत ' दृष्यम' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सर्व पुरावे नष्ट केल्याची कबुली रजनीशने पोलिसांसमोर दिली.
रजनीश हा आधीच विवाहीत असून त्याला दोन मुलेही आहेत, मात्र त्याला एका मॉडर्न मुलीसोबत लग्न करून दिल्लीत स्थायिक व्हायची इच्छा होती. त्यासाठीच त्याने एका मॅट्रीमोनिअल साईटवर एक उच्चभ्रू व्यक्ती म्हणून नाव नोंदवले. तेथेच त्याची ओळख सृष्टी या तरूणीशी झाली आणि ती त्याला भेटण्यासाठी पाटणा येथे आली. मात्र भेट झाल्यानंतर सृष्टीने त्याला नकार दिल्याने दोघांमध्येही कडाक्याचा वाद झाला. त्यानंतर ती घरी परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे जात असतानाच रागावलेल्या रजनीशने त्याच्या भावासह तिला गाठले आणि तिची हत्या केली. 
मात्र या हत्येचा कोणालाच सुगावा लागू नये यासाठी त्याने 'दृश्यम' चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच सर्व पुरावे नष्ट केले. मोबाईल लोकेशनद्वारे पोलीस आपला माग काढू शकतील हे लक्षात आल्याने रजनीशने रस्त्यावरील एका ट्रकमध्ये त्याचा फोन फेकून दिला. तसेच एका मच्छिमाराकडून बोट भाड्याने घेतली व आपली रॉयल एनफिल्ड मोटरसायकलही नदीत फेकून दिली. 
मात्र एवढ्या सर्व प्रयत्नानंतरही पोलिसांनी त्याचा शोध लावत त्यालाच अटक केलीच. पोलिसांकडे हत्येचा कबुलीजबाब देताना रजनीशच्या चेह-यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता.