पाटणाः दरभंगाचे जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी हिनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तिनं स्वतःची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली असून, बऱ्याच वर्तमान पत्रात तिनं याची जाहिरातही दिली आहे. तिनं बिहारच्या जनतेला संबोधित करत एक पत्रसुद्धा लिहिलं आहे. प्लूरल्स नावानं तयार केला राजकीय पक्षलंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या पुष्पम प्रिया चौधरीनं प्लूरल्स (PLURALS) नावानं पक्षाची स्थापना केली असून, त्या पक्षाची ती अध्यक्ष आहे. पुष्पम प्रियानं लंडनमधल्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेजमधून मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या आयडीएसमधून तिनं डेव्हलपमेंट स्टडिजमध्ये एमएसुद्धा केलं आहे. पुष्पम प्रिया चौधरीनं ट्विट करत बिहारच्या जनतेला आवाहन केलं आहे की, बिहारच्या प्रगतीला वेग पाहिजे असेल तर बिहारमध्ये बदल घडलाच पाहिजे. कारण बिहारला आणखी प्रगती करण्याचा हक्क आहे. बिहारला 2020मध्ये प्रगतिपथावर नेण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी प्लूरल्स (पार्टी)शी जोडले जावा.
लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 8:17 AM
पुष्पम प्रियानं लंडनमधल्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेजमधून मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे.
ठळक मुद्देमाजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी हिनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तिनं स्वतःची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली असून, बऱ्याच वर्तमान पत्रात तिनं याची जाहिरातही दिली आहे. लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या पुष्पम प्रिया चौधरीनं प्लूरल्स (PLURALS) नावानं पक्षाची स्थापना केली असून, त्या पक्षाची ती अध्यक्ष आहे.