पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एका तरूणाला तीन मुलींसोबत खोलीत पोलिसांनी पकडले आहे. खोलीतील कल्लोळाचा आवाज ऐकू आल्यावर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र खोलीची अवस्था पाहून पोलिसांना देखील धक्का बसला. पोलिसांनी दोन मुलींसह एका मुलाला अटक केली आहे.
खोलीत मुलींसोबत सुरू होती दारूची पार्टीपाटण्यातील शास्त्रीनगर पोलीस स्थानक क्षेत्रातील आश्रम गल्लीमध्ये मुलासोबत वाढदिवसाच्या पार्टीत दारू पिणाऱ्या दोन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही मुलींसोबत मुलगा देखील दारूच्या नशेत होता. या सर्वांची ब्रेथ ॲनालायझरने तपासणी केल्यानंतर त्यांनी मद्यपान केल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. शास्त्रीनगरचे एसएचओ रमाशंकर सिंह यांनी सांगितले की, आणखी एका मुलीलाही पकडण्यात आले होते, परंतु तिने दारू प्यायली नसल्याचे समोर आल्यामुळे तिला सोडण्यात आले.
खोलीत प्रवेश करताच पोलिसांना बसला धक्कापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली मूळच्या सीतामढी येथील रहिवासी आहेत. ज्या राजाबाजार येथील आश्रम गल्लीत भाड्याच्या खोलीत राहतात. शनिवारी रात्री उशिरा काही जण दारूच्या नशेत गोंधळ घालत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि खोलीचा दरवाजा उघडला. खोलीत तीन मुली आणि एक मुलगा होता. त्याच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याचे आढळून आले.
काजलनेच मागवली होती दारू पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अटक करण्यात आलेल्या काजलचा वाढदिवस होता. या पार्टीत दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश होता. मात्र एका मुलाने पोलीस पोहचण्याच्या आधीच तिथून पळ काढला. काजलनेच वाढदिवसाच्या पार्टीला दारू मागवली होती. फरार तरूण कोण आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.