आकृतीबंध मंजूर झाले; आता आरक्षण निश्चितीचे वेध मनपाच्या नवनिर्मित पाचशे पदांसाठी आरक्षणाची पायरी
By admin | Published: January 19, 2016 12:38 AM
नांदेड : महापालिका कर्मचारी आकृतीबंध शासनाने मंजूर केल्यानंतर आता नवनिर्मित पदांच्या आरक्षणाची पायरी चढावी लागणार आहे़ त्यासाठी औरंगाबाद येथील बीसीसीएल विभागाकडून पद आरक्षण निश्चित होईल, त्यानंतर नोकर भारतीची प्रक्रिया महापालिकेला करावी लागणार आहे़
नांदेड : महापालिका कर्मचारी आकृतीबंध शासनाने मंजूर केल्यानंतर आता नवनिर्मित पदांच्या आरक्षणाची पायरी चढावी लागणार आहे़ त्यासाठी औरंगाबाद येथील बीसीसीएल विभागाकडून पद आरक्षण निश्चित होईल, त्यानंतर नोकर भारतीची प्रक्रिया महापालिकेला करावी लागणार आहे़ नऊ वर्षानंतर मंजूर झालेल्या महापालिकेच्या आकृतीबंधात एकूण २ हजार ८३५ पदे प्रस्तावित आहेत़ महापालिकेत मंजूर पदे २ हजार ३३८ असून नवनिर्मित पदे ४९७ पदे निर्माण करण्यात आली आहेत़ हा प्रस्ताव क वर्ग महापालिका वसई विरार महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियमास अनुरूप तयार केला होता़ आयुक्त सुशील खोडवेकर यांनी तब्बल ४९७ नवनिर्मित पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे येणार्या काळात महापालिकेत नोकर भरतीची संधी आहे़ आकृतीबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर नवनिर्मिती पदांसाठी बिंदू नामावली तयार करण्यात येईल़ पद आरक्षणानंतरच ही नोकर भरती करण्यात येईल़ आकृतीबंधानंतर दुसरा टप्पा बिंदू नामावलीचा असल्याने पुढील चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे़ महापालिकेचा कार्यभार सांभाळण्यासाठी मागील काही वर्षापासून प्रभारी पदे निर्माण करून महापालिकेचा पदभार सांभाळण्यात येत आहे़ अतिरिक्त कामांच्या ओझ्याने वाकलेल्या कर्मचार्यांचे नव्या भरतीकडे लक्ष होते़ २००६ मध्ये महापालिकेत ३८ पदे मंजूर झाले होते़ उपायुक्त पदे तीन मंजूर होती़ आता दोन नवीन उपायुक्तांच्या जागा भरण्यात येतील़ त्यामुळे पाच उपायुक्त व दहा सहायक आयुक्त लाभणार आहेत़चौकट- ४नवीन पदात महापौर, उपमहापौर, सभापती यांच्यासाठी लघू लेखक पद भरण्यात येतील़ कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांच्याही जागा वाढविण्यात आल्या आहेत़ सहायक नगररचना हे पद आता उपसंचालक नगररचना म्हणून निर्माण होत आहे़ नगरसचिवासोबतच उपसचिव व मुख्य विधी अधिकारी हे पदे निर्माण केली आहेत़ ४शिक्षण विभागात १२२ पदे मंजूर असून नवीन ४२ पदे मागण्यात आले आहेत़ ९ शिक्षणविस्तार अधिकारी व १३ केंद्रप्रमुख निर्माण होत आहेत़