अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायासाठी पळवून नेण्याचा प्रयत्न पवन एक्सप्रेसमधील घटना : पोलीस व प्रवाशांच्या मदतीने झाली सुटका
By admin | Published: September 23, 2016 12:51 AM
जळगाव: पवन एक्सप्रेसमधून दोन अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी पळवून नेण्याचा प्रयत्न गुरुवारी संध्याकाळी सात वाजता प्रवाशी व पोलिसांनी हाणून पडला. जळगाव रेल्वे स्थानकावर या मुलींची सुटका करण्यात आली तर पळवून नेण्यार्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्याचे लक्षात आल्याने यातील दोन महिला पाचोरा येथेच उतरुन गेल्या आहेत.
जळगाव: पवन एक्सप्रेसमधून दोन अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी पळवून नेण्याचा प्रयत्न गुरुवारी संध्याकाळी सात वाजता प्रवाशी व पोलिसांनी हाणून पडला. जळगाव रेल्वे स्थानकावर या मुलींची सुटका करण्यात आली तर पळवून नेण्यार्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्याचे लक्षात आल्याने यातील दोन महिला पाचोरा येथेच उतरुन गेल्या आहेत.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई येथून तीन महिला १६ व १३ वर्षाच्या मुलींना पवन एक्सप्रेसमधून उत्तर प्रदेशाकडे घेऊन जात होत्या. महिला बोगीतून प्रवास करणार्या या मुलींना गुंगीचे औषध देण्यात आले होते. याच बोगीत जळगाव येथील महिला दक्षता समितीच्या सदस्या शोभा कुमावत यादेखील प्रवास करीत होत्या. चाळीसगाव स्टेशन सोडल्यानंतर या तीन महिलांची हालचाल संशयास्पद वाटल्याने कुमावत यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले होते.वृध्द महिलेने केली वाच्यताचाळीसगाव स्टेशन सुटल्यानंतर यातील एका मुलीला बाथरुमला जायचे असल्याने दोन्ही महिला तिचा हात धरुन घेऊन गेल्या. ही मुलगी मराठी बोलत असल्याने तिने बाथरुमच्या बाजूला बसलेल्या पाचोरा येथील एका वृध्द महिलेला या दोन महिला आम्हाला जबरदस्तीने पळवून नेत असल्याचे कानात सांगितले. त्यावर या वृध्द महिलेने शेजारच्या लोकांना हा प्रकार सांगून पाचोरा येथील नातेवाईकांना फोनवरुन ही माहिती दिली. तितक्यात पाचोरा स्टेशन आले. बोगीत या प्रकाराची चर्चा होताच सोबतच्या दोन्ही महिलाही तेथेच उतरुन गेल्या. मुंबईच्या पोलिसाने हलवले सूत्रसर्वत्र फोनाफानीनंतर हा प्रकार वरळी पोलीस स्टेशन (मुंबई ) येथे कार्यरत असलेल्या व सध्या पाचोरा येथे घरी सुटीवर आलेल्या पंकज नारायण चौधरी या पोलीस कर्मचार्याला समजला. त्याने तातडीने सूत्र हलविली,मात्र तितक्या वेळेत पाचोरा येथे मुलींची सुटक करणे शक्य न झाल्याने चौधरी यांनी जळगाव येथे मुख्यालयात असलेल्या मंगेश पाटील, भूषण चौधरी व महेंद्र उमाळे यांना सांगितला. आरटीओ कार्यालयातील मंगेश सोनार यांनाही हा प्रकार समजल्याने त्यांनी मित्रांना सोबत घेतले.या सर्वांनी जळगाव रेल्वे स्टेशन गाठले. गाडी प्लॅटफार्मवर येताच सर्व कर्मचारी व त्यांच्या मित्रांनी दोन्ही बाजूंच्या दरवाजाला वेढा घालून चौकशी केली असता शोभा कुमावत यांनी ती महिला व दोन्ही मुलींना दाखवले. त्यांच्या मदतीने तिघांना लोहमार्ग चौकीत आणण्यात आले.