शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

शहीद मुलाच्या मिशांना ताव मारत 'माऊली'नं ठोकला सलाम; ३० वर्षीय जवानाला हौतात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 1:15 PM

भारतीय लष्कारत तैनात असलेल्या पवन कुमार या जवानाला सोमवारी वीरमरण आले.

नवी दिल्ली : भारतीय लष्कारत तैनात असलेल्या पवन कुमार या जवानाला सोमवारी वीरमरण आले. हृदयविकाराच्या झटक्याने ३० वर्षीय जवानाची प्राणज्योत मालवली. मूळचा हरयाणा येथील असलेला पवन कुमार राजस्थानमधील जैसलमेरमध्ये तैनात होता. शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या पवनचे पार्थिव मंगळवारी हरयाणा येथील त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. शासकीय इतमामात वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्याच्या आईसह कुटुंबीयांचा टाहो पाहून जमलेल्या गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. 

'पवन कुमार अमर रहे' अशा घोषणांनी परिसर दुमदुमन गेला होता. आपल्या शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी 'खराळ' गावातील महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच आजूबाजूच्या गावातील लोकही शहीद पवन कुमार याच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. लक्षणीय बाब म्हणजे आपल्या तोंडचा घास गेल्याने पवन कुमारची आई हतबल झाली. पण तरीदेखील त्या माऊलीनं आपल्या शूर लेकाच्या मिशांना ताव देत त्याला सलाम ठोकला. 

३० वर्षीय जवान शहीदशहीद पवन कुमार याला लहानपणापासूनच देशसेवेची आवड होती. 'आम्हाला आमच्या मुलाच्या हौतात्म्याचा अभिमान' असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. पवन कुमारच्या आईने आपल्या शहीद मुलाच्या मिशांना ताव देत हौतात्म्याला सलाम ठोकला. लष्कराच्या वतीने नायब सुभेदार एलएन जीना यांच्या नेतृत्वाखालील जवानांच्या तुकडीने आणि हरयाणा पोलिसांच्या तुकडीने जवानाला सलामी देऊन अखेरचा निरोप दिला.

टॅग्स :HaryanaहरयाणाIndian Armyभारतीय जवानMartyrशहीदRajasthanराजस्थान